मुंबई

खडसेंनंतर आता भाजप आमदाराच्या तोंडी 'ED अन् CD'ची भाषा

खडसेनंतर आता भाजप आमदाराच्या तोंडी 'ED अन् CD'ची भाषा वाचा नक्की हे प्रकरण आहे तरी काय? We will show Mumbaikars Corruption's CD of Shivsena instead of ED says BJP MLA Prasad Lad

सकाळ वृत्तसेवा

वाचा नक्की हे प्रकरण आहे तरी काय?

मुंबई: "कोविड काळात केलेल्या कामाचं श्रेय शिवसेना आणि पालिका प्रशासन घेऊ पाहत आहे. मात्र यात सर्वांचा सहभाग आहे. कोविड काळात मुंबईसाठी नगर सेवक, आमदार, खासदार, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी काम केलं. मात्र यासाठी ठराविक लोकांचं कौतुक होणे योग्य नाही. या दरम्यान शिवसेनेने जो भ्रष्ट्राचार केला आहे ती प्रकरण आम्ही नक्कीच बाहेर काढणार. ही प्रकरणं केंद्र सरकारपर्यंत पोचवणार आणि शिवसेनेचा खरा चेहरा लोकांना कळावा, यासाठी आता 'ईडी' नाही तर त्यांच्या भ्रष्टाचाराची 'सीडी' लावणार", असा इशारा भाजपचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी दिला. (We will show Mumbaikars Corruption's CD of Shivsena instead of ED says BJP MLA Prasad Lad)

"एकेकाळी सर्वसामान्यांना मदत करणार शिवसेना आता उरली नाही. रस्त्यावर उतरणारी शिवसेना आता रस्त्यावर दिसत नाही. पूर्वी शाखा प्रमुख हा नेहमी शाखेमध्ये दिसायचा आणि लोकांना मदत करायचा. पण आता मात्र 'त्या' शाखांमध्ये लोकांना मदत नाही तर 'तोडपाणी' चालते", असा घणाघात लाड यांनी केला.

Prasad Lad

"मुंबई महापालिकेवर शिवसेनेची गेली 25 वर्ष सत्ता आहे. या दरम्यान त्यांनी केवळ भ्रष्टाचार केला. आज ही मुंबईत आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्त्यांवरील खड्डे, मल:निस्सारण प्रक्रिया केंद्र यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मल:निस्सारण प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी 14 हजार कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला. मात्र हे काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे हरित लवादाकडून मुंबई महापालिकेला दररोज 4 लाख रुपयांचा दंड भरावा लागत आहे. सध्या मलनिस्सारण प्रक्रिया केंद्राच कामाच्या निधीमध्ये 70 % वाढ झाली आहे.यावर कॅग ने देखील ताशेरे ओढले.यातून मुंबईकरांच्या खिशावर डल्ला मारला गेला. याचा विचार होणे गरजेचे आहे", असे लाड म्हणाले.

"शिवसेनेने कोविड काळात मोठा भ्रष्टाचार केला. या दरम्यान 2200 हजार कोटींच्या वस्तूंची खरेदी कोणत्याही निविदेशिवाय करण्यात आली. 5 लाख रुपयांच्या वरील कामासाठी स्थायी समितीच्या मंजुरीची आवश्यकता असते. मात्र इथे या मंजुरिंना बगल देण्यात आली.याशिवाय मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाची निविदा न काढता हे काम परस्पर केलं गेलं. याबाबत आम्ही पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार नोंदवली आहे. तसेच या विरोधात आम्ही लोकायुक्त तसेच न्यायालयात जाणार आहोत", अशी माहिती प्रसाद लाड यांनी दिली.

भाजप आता पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणूक देखील भाजप स्वबळावर लढवेल. मुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्याचं आमचं स्वप्न आहे. पालिकेवर कमळ फुलवण्याचा आम्ही सर्वांनी विडा उचलला आहे. पालिकेमध्ये भाजपची सत्ता येईलच असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT