मुंबई

मुंबईमध्ये ठंडा ठंडा, कुल कुल ! नवीन वर्षाची सुरवात मस्त गारेगार

मिलिंद तांबे

मुंबई,ता. 4  : मुंबईत जानेवारी महिन्यात अनेकदा किमान तापमानाची नोंद झाली आहे. या वर्षाची सुरुवात देखील गारेगार झाली असून रविवारी मुंबईत किमान तापमान 15 अंश सेल्सियस च्या खाली नोंदवले गेले. झाली. रविवारी मुंबईत किमान तापमानाची नोंद झाल्यान मुंबईकरांनी गुलाबी थंडीचा आनंद घेतला. 

मुंबई थंडीचा जोर वाढला आहे. किमान तापमानात घट होऊन गेल्या 24 तासातील मुंबईचे किमान तापमान 15 अंश सेल्सिअय नोंदवले गेले. मुंबईत यापूर्वी जानेवारी महिन्यात 22 जानेवारी 1962 रोजी मुंबईत 7.4 अंश सेल्सियस नोंद झाली होती.

पुढील 3 ते  4 दिवसात मुंबईतील पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज असून मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र त्याची तीव्रता अधिक नसेल असे ही त्यांनी म्हटले आहे.

ज्यातले किमान तापमानात येत्या 3/4 दिवसात काही प्रमाणात आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे 16-18 अंशाच्या आसपास, नाशिक, पुणे 14-16 अंशाच्या दरम्यान व अन्य भागात 16 अंश तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात 18-20 अंश सेल्सियस तापमान राहण्याची शक्यता आहे.

जानेवारी 6 व 7 रोजी कोकण ,गोवा, मध्य महाराष्ट्र तसेच काही तुरळक ठीकाणी, हलक्या पावसाची शक्यता ही मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे

( संपादन - सुमित बागुल ).

weather updates of mumbai pleasant cold weather in city 15 degree recorded on sunday 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्यात पहिल्यांदा सोन्याच्या भावात घसरण; चांदीही सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त; काय आहे तुमच्या शहरातील आजचे भाव?

Maharashtra Cold Wave : हुडहुडी भरवणारी थंडी! महाराष्ट्रात पारा घसरला, विदर्भातील तापमान १० अंशाच्याही खाली...

अभिनेता प्रसाद जवादेला मातृशोक, कर्करोगाच्या आजारामुळे आईचं दु:खद निधन

Humanity Story: कोवळ्या जीवांना मिळतो मायेचा स्पर्श; नवजात शिशू अतिदक्षता विभागात ख्रिसमसच्या पर्वावर अवरतला ‘पर्पल सांता’..

Latest Marathi News Live Update : मनसेचा आज मुंबईत पहिला मेळावा, राज ठाकरे करणार संबोधित

SCROLL FOR NEXT