local 
मुंबई

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा; पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यात आजपासून वाढ...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने नुकतेच मुंबईतील मंत्रालयीन कर्मचारी, महापालिकेचे कर्मचारी तसेच आरोग्यविषयक कर्मचारी तसेच सफाई कामगार आदी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू केली आहे. यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरून 200 आणि पश्चिम रेल्वे मार्गवरून 162 फेऱ्या धावत होत्या. आजपासून (ता.29) पश्चिम रेल्वे मार्गावरील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आणखी 40 फेऱ्या वाढ करण्याचे आल्याचे पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे. त्यामुळे आता आजपासून 202 फेऱ्या धावणार आहेत.
 
1 जुलैपासून मुंबईत काय असेल, लॉकडाऊन की अनलॉक 2?...असा असू शकेल अनलॉक-2

अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी 15 जूनपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरून 200 आणि पश्चिम रेल्वे मार्गवरून 162 फेऱ्या धावत होत्या. मात्र आता पश्चिम रेल्वे मार्गवरून आणखी 40 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

चर्चगेट ते बोरिवली दोन्ही दिशेकडे 20 लोकल फेऱ्या या धीम्या मार्गावर धावतील. बोरिवलीहून वसई रोडसाठी धीम्या मार्गावर दोन लोकल फेऱ्या धावतील.  वसई रोडहून चर्चगेटसाठी जलद मार्गावर दोन लोकल फेऱ्या धावतील. विरारहून बोरिवलीसाठी धीम्या मार्गावर दोन लोकल फेऱ्या धावतील. चर्चगेट ते विरार जलद मार्गावर 8 आणि विरार ते चर्चगेट 6 लोकल फेऱ्या धावतील, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

Loni Kalbhor Police: लोणी काळभोर पोलिसांची एंजल हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा व महिला संरक्षणावरील जनजागृती कार्यशाळा

Career Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक वारंवार नोकरी बदलतात; पण याच निर्णयामुळे बनतं लाखोंचं करिअर

National Cycle Competition : मणीपूरचा अथोकपम बीके सिंग पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा यंदाचा विजेता....

Live Updates Marathi: शिवाजी पार्कातील आंदोलकांच्या भेटीसाठी राज ठाकरे दाखल

SCROLL FOR NEXT