मुंबई

Maharashtra Loksabha: शिंदेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये नक्की वाद आहे तरी काय? जाणून घ्या इनसाइड स्टोरी

दोन पक्षांमध्ये वाद नक्की आहे काय? आणि नेमका जागा वाटपाचा हा तिढा का सुटत नाहीये? असा प्रश्न कित्येकांना पडत आहे | Is there a dispute between the two parties? And why is this crack of allotment of space not getting resolved? Many people are asking this question

Chinmay Jagtap

अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकारी चाळीस आमदारांसह नॉट रिचेबल झाले. पुढे हिंदुत्वासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती केली.

मात्र आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर शिवसेना विरुद्ध भाजप असे चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. मात्र या दोन पक्षांमध्ये वाद नक्की आहे काय? आणि नेमका जागा वाटपाचा हा तिढा का सुटत नाहीये? असा प्रश्न कित्येकांना पडत आहे.

भाजपने महाराष्ट्रामध्ये महायुतीतील घटक पक्षांसोबत 'जिंकू शकाल त्याच जागा मागा’ हे धोरण राबवले असल्यामुळे सध्या भाजप विरुद्ध शिवसेना असे चित्र पाहायला मिळत आहे.

काय आहे शिवसेनेचे म्हणणे?

धनुष्यबाण याच चिन्हाला मत देण्याची सवय लोकांना आहे. याकडे लक्ष भाजपने देखील द्यायला हवे. असा युक्तिवाद शिंदे गटाकडुन केला जात आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, दक्षिण मुंबई हे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचं प्रभावक्षेत्र मानलं जातं. या ठिकाणी कधीही कमळ हे चिन्ह वापरलं गेलं नाहीये. अशावेळी या ठिकाणी हे मतदारसंघ आपल्यालाच मिळाला हवेत असा दावा शिवसेनेचा आहे. तर दुसरीकडे कोकणामध्ये नारायण राणे यांच्यापेक्षा रामदास कदम हे जागा जिंकून देऊ शकतात असा युक्तिवाद शिवसेनेचा आहे. तर जिंकलेल्या प्रत्येक जागेवर भाजपचा नसून आमचाच हक्क आहे असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

काय आहे भाजपचे मत?

भाजपला महाराष्ट्रात कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये. भाजपने केलेल्या सर्वेनुसार शिवसेनेचे कित्येक विद्यमान खासदार निवडून येण्याची शक्यता खूप कमी आहे. अश्यावेळी त्यांच्या जागी आपले उमेदवार उभे करायचे आणि त्यांना ताकद देऊन आपला उमेदवार जिंकून आणायचा असा भाजपचा प्लॅन असल्याची चर्चा आहे. यामुळे भारतीय जनता पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम असून महाराष्ट्रात शिवसेनेला दोन आकडी जागा देण्यास पक्ष तयार नाही असे चित्र आहे.

शिवसेनेचे उमेदवार कमळावर लढणार?

अजून एका मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपच्या कमळ चिन्हावर उभे करण्याचा देखील विचार येत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र असा प्रस्ताव खरंच आला आहे का? आणि शिवसेनेला हे मान्य आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही.

मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना काय करू शकते?

जर भाजपने मागण्या मान्य केल्या नाहीत तर शिवसेना काय करेल असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे यावेळी शिवसेना कोणताही विरोध ना करता आपल्या पारड्यात जास्तीत जास्त जागा पडून घेईल असे बोलले जात आहे.

बंड होण्याची शक्यता?

जर भाजपने शिवसेनेच्या प्रमुख जागांवर आपले उमेदवार दिले तर शिवसेनेचे खासदार बंड करतील अशी चर्चा आहे. मात्र ती करण्याची हिम्मत कोणी दाखवेल असे चित्र नाही. कारण मोदींच्या करिष्म्यापुढे अपक्ष जिंकून येणे खूप कठीण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Bhavan Clash: वाद नेत्यांमध्ये, पण भिडले कट्टर कार्यकर्ते! पडळकरांचा मारहाण करणारा आणि आव्हाडांचा मारहाण झालेला कार्यकर्ता कोण?

Uddhav Thackeray targets Devendra Fadnavis: ‘’...तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक, मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात’’ ; उद्धव ठाकरे कडाडले!

ENG vs IND : रिषभ पंतकडून प्रेरणा घेत भारताच्या महिला क्रिकेटरनेही एकाहाताने मारला 'सुपर सिक्स', Video Viral

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

SCROLL FOR NEXT