मुंबई

केंद्राने तर सांगितलं, पण राज्य सरकारचं मद्य विक्रीवर काय म्हणणंय? वाईन शॉप उघडणार का नाही वाचा..

सकाळवृत्तसेवा

मुंबई  : केंद्र सरकारने मद्य विक्री, तंबाखुसह इतरही वस्तुं आणि खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी परवानगी दिली आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात राज्य सरकारची आपत्ती व्यवस्थापन समिती निर्णय घेणार आहे. त्यानंतर राज्यातील अंमलबजावणी संदर्भातील नविन आदेश  काढणार आहे. अद्याप केंद्राच्या आदेशावर राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नसल्याने सोमवार पर्यंत मद्य, तंबाखू यासह इतरही वस्तु, खाद्य विक्रीसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. 

राज्यात सध्या लाॅकडाऊनच्या काळात फक्त जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू आहे. तर मद्य, तंबाखु अशा वस्तूंच्या विक्रीला परवानगी नाही. त्यामूळे मद्यप्रेंमीची पंचाईत झाली आहे. यासाठी तळीरामांकडून सोशल माध्यमांवर व्हिडीओ आणि विविध पोस्ट करून मद्य विक्री सुरू करण्याची मागणी सुरू केली आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्ट्रीने नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी अद्याप राज्य सरकारने यासंदर्भात निर्णय घेतला नसल्याचे दिसून येत आहे.

मात्र, केंद्र सरकारने मद्य, तंबाखु आणि इतर वस्तु, खाद्य पदार्थांच्या विक्री सुरू करण्याची मान्यता दिल्यानंतर ही राज्यातील अमंबजावणी संदर्भातील भुमीका राज्यातील राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेली आपत्ती व्यवस्थापन समिती निर्णय घेणार आहे. त्यामूळे अद्याप हा निर्णय झाला नसून, सोमवार पर्यंत निर्णय होणार आहे. 

मात्र, यानिर्णयामध्ये मद्य, तंबाखु अशा मादक पदार्थांना मान्यता मिळणार का हे निर्णयानंतरच माहिती पडू शकनार आहे. 

मोफत फॉर्मची दहा रुपयांना विक्री; मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणतात ना ते हेच

राज्य सरकारचे अद्याप नोटीफिकेशन निघाले नाही. केंद्राच्या नोटीफिकेशन नंतर राज्य सरकारची आपत्ती व्यवस्थापन समिती निर्णय घेऊन दुसरे नोटिफिकेशन काढते, त्यानंतर त्यानंतर राज्यात काय सुरू किंवा काय बंद ठेवायचा हा निर्णय होईल, मात्र राज्याचा निर्णय झाल्याशिवाय काहीही सुरू होणार नाही.  - दिलीप वळसे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री. 

what state government is saying about opening on wine shops in green and orange zone of mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे दीडशतक अन् भारताच्या साडेचारशे धावा पार; पण दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा जोरदार पलटवार

ऑनलाइन परीक्षा घेण्याची सरकारचीच लायकी नाही! संभाजीनगरमध्ये कोर्टाच्या परीक्षेत गडबड, अभिजित दिपके संतापले

Godavari flood tragedy: गोदावरीच्या पुरात विजेचा धक्का; मासेमारीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, सावखेडा गावात शोककळा

Marathi News Live Updates : ''गोपीनाथ मुंडे काँग्रेससोबत असते तर...''; पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान पुन्हा चर्चेत

MPSC Success : कोकडेवाडीच्या शेतकरी पुत्राचा पराक्रम: संजय शितोळे यांची MPSC दुय्यम निबंधक पदावर निवड

SCROLL FOR NEXT