मुंबई

नवजात बाळासाठी हानिकारक आहे का कोरोनाबाधित आईचं स्तनपान?

सकाळवृत्तसेवा

मुंबई: सध्या कोरोनानं जगात हाहाकार माजवला आहे. त्यात कोरोनाचं सर्वाधिक संकट  वृद्ध त्याचसोबत गर्भवती महिला आणि बाळंतीण महिलांवर आहे असं बोललं जातंय. मात्र गर्भवती महिला किंवा बाळंतीण महिला कोरोनाबाधितअसतील तर त्यांच्या बाळावर याचा काय परिणाम होऊ शकतो, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नुकतीच एक केस मुंबईतून समोर आली, ज्यामध्ये ३ दिवसाच्या बाळाची आणि त्यांच्या आईची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही टेस्ट खासगी रुग्णालयात केली होती. या नंतर कस्तुरबामध्ये कोरोना चाचणी निगेटिव्ह आली हे देखील आता स्पष्ट झालंय. मात्र अशा सिथिती  नवजात बाळासाठी कोरोनाबाधित आईचं स्तनपान हानिकारक आहे का? जाणून घेऊ. 

बाळासाठी हानिकारक आहे का कोरोनाबाधित आईचं स्तनपान:

जर कुठली महिला कोरोनाबाधित असेल तर बाळाला स्तनपान करणं हानिकारक आहे का? असा सवाल प्रत्येक आईच्या मनात  येत असेल. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत स्तनपान करत असलेल्या कुठल्याही नवजात शिशुला कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे महिला कोरोनाबाधित असेल तरी तिच्या बाळाला तिला स्तनपान करवता येणं शक्य आहे. मात्र त्यासाठी महिलांना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

बाळंतीण महिलांनी स्तनपान करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी  

  • यासाठी स्तनपान करवणाऱ्या महिलांना मास्क लावणं आवश्यक असणार आहे.
  • तसंच श्वास घेण्याच्या पद्धतीचंही पालन करणं आवश्यक आहे.
  • तसंच बाळाला हातात घेताना स्वच्छ हात धुणं आवश्यक आहे.
  • जर बाळाला घेऊन रुग्णालयात किंवा घरी कुठेही जात असाल तर तिथल्या स्वच्छतेवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे.
  • काळजी करण्याचं काहीही कारण नाही. कारण आईच्या दुधात कोरोना व्हायरस अजूनपर्यंत आढळलेला नाही. त्यामुळे तुमचं बाळ सुरक्षित आहे याची खात्री बाळगा.

गरोदर महिलांसाठी किती धोकादायक आहे कोरोना व्हायरस :

गरोदर असलेल्या महिलांना कोरोनाचा धोका अधिक आहे असं काही जणांचं म्हणणं आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे गरोदर असताना महिलांची रोगप्रतिकारक शक्ती नेहमीच्या तुलनेत कमी असते त्यामुळे या व्हायरसची लागण होण्याची भीती गरोदर महिलांना जास्त आहे. त्यामुळे या काळात गरोदर  महिलांनी आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्याची जास्त गरज आहे.

 इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी हे करा उपाय:

रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी भरपूर प्रमाणात बिटचं किंवा बीटच्या ज्युसचं सेवन करा.
आयर्न म्हणजेच लोह वाढवण्यासाठी पालक, कच्ची केळी यांचा सेवन करा. खजूर आणि सुका मेव्याचा आहारात समावेश करा. मात्र, डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आपल्या आहारात बदल करा.

what WHO says about feeding baby during covid 19 read detail report 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT