मुंबई

३ मे नंतर काय होऊ शकतं ? दुसऱ्या लॉक डाऊन नंतर तिसरा लॉक डाऊन ?

सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत .त्यामुळे राज्यात ३ मेनंतर  लॉकडाऊन मागे घेणं योग्य आहे की नाही याबाबद्दल डॉक्टरांचं काय मत आहे हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.  

ग्रीन झोनमध्ये लॉकडाऊन मागे घेणं योग्य:

"मुंबईत तीन मे नंतर लॉकडाउन मागे घेताना शासनाला अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. मात्र आरोग्य तज्ज्ञ म्हणून ग्रीन झोनमध्ये लॉकडाउन मागे घेतानाही तो अत्यंत योजनाबद्धपणे घ्यावा लागेल",असं राज्याचे माजी आरोग्य महासंचालक डॉ सुभाष साळुंखे यांनी सांगितलंय.

महाराष्ट्र आणि मुंबईत ३ मे नंतर लॉकडाउन मागे घेण्याबाबत विचारलं असता “राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे फारसे रुग्ण नाहीत म्हणजे ग्रीन झोन आहे अशा जिल्ह्यात व्यवहार खुले करताना ते एकदम न करता योजनाबद्ध पद्धतीनं करणं गरजेचे आहे. तसंच या जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या पाहिजेत. जेणेकरून बाहेरून कोरोनाचा संसर्ग होणार नाही. मुंबईचा विचार करताना आपण हॉट स्पॉट, तीव्र हॉटस्पॉट, तसंच क्लस्टर असा विचार करूनच लॉकडाउन बाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. तीन मे नंतर संपूर्ण मुंबईत किंवा एमएमआर विभागात लॉकडाउन वाढवण्याऐवजी ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन विभागाचा विचार करून निर्णय घेता येऊ शकतो. यासाठी ३० एप्रिलला विभागनिहाय काय परिस्थिती आहे याचा आढावा घेऊनच निर्णय घ्यावा लागेल” असंही डॉ साळुंखे यांनी म्हंटलंय.

“मुंबईत धारावी, वरळीसह उपनगरात करोनाची लागण जास्त असल्याचं दिसून येतंय. आजच्या घडीला मुंबईत ८१३ हॉटस्पॉट आहेत. ३० एप्रिलपर्यंत इथला तसंच अन्य भागांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन विभागनिहाय लॉकडाउनचा निर्णय करता येऊ शकेल. मात्र मुंबईसह राज्यात हिरव्या क्षेत्रात लॉकडाउन मागे घेण्याचा निर्णय घेतला तरी तो सरसकट मागे घेणे योग्य ठरणार नाही."असंही डॉक्टर साळुंखे यांनी म्हंटलय. 

मुंबईकरांची घरात बसण्याची मानसिकता नाही:

"दिवसरात्र धावते ते शहर म्हणजे मुंबई. येथील कोणतीही व्यक्ती स्वस्थ बसणारी नाही तरीही एवढे दिवस लोकांनी लॉकडाउनला चांगल्या प्रकारे सहकार्य केलंय. आता तीन मे नंतर मुंबईतील ग्रीन झोनमध्ये सरकारनं लॉकडाउन मागे घेतला तरी योग्य काळजी घेऊनच त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. लॉकडाउनचा विचार करताना प्रत्येक विभाग हा एक जिल्हा आहे असे समजून विचार करणं आवश्यक आहे. विभागातले हॉटस्पॉट तसंच हॉटस्पॉटचे क्लस्टर करून त्यानुसार निर्णय घेतला जावा" असं केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ अविनाश सुपे यांनी सांगितलंय.

टप्प्याटप्प्यानं घेतला जावा निर्णय:

“मुंबईत लॉकडाउन मागे घेताना विशेष काळजी घेतली पाहिजे. अजूनही कोरोनाचे जसे रिपोर्टिंग व्हायला हवे तसे ते होत नाही. पुरेशा चाचण्या होण्याची गरज आहे. तसंच ज्या मार्गदर्शक तत्वांचं पालन व्हायला हवं त्यात म्हणावी तेवढी सुसुत्रता नसल्यानं ३० एप्रिलपर्यंत रेड,ऑरेंज आणि ग्रीन झोन्सचा सखोल आढावा घेऊनच मुंबईत लॉकडाऊन मागे घेण्याचा निर्णय घ्यावा लागेल” असंहीही डॉ सुभाष साळुंखे यांनी स्पष्ट केलंय.

what doctors think about resuming all business after extended lockdown gets over on 3rd may 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT