aarey carshed google
मुंबई

मेट्रो ३ कारशेडच्या उभारण्यासाठी तिसरा पर्याय कोणता ? खर्च वाढणार ?

विविध ठिकाणी छोट्या स्वरुपातील कारशेड उभारण्याचाही पर्याय स्वीकारल्यासही प्रकल्पाचा खर्च वाढू शकेल.

नमिता धुरी

मुंबई : आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेऊन ३ वर्षे लोटली असतानाही अद्याप राज्य सरकारला या निर्णयाची अंमलबजावणी करता आलेली नाही; कारण केंद्र शासनाने कांजूरमार्गच्या जागेवर आपल्या मालकीचा दावा केला आहे. जागेवरील मालकीचा वाद न्यायालयात असल्याने आता राज्य सरकारने कारशेडसाठी तिसऱ्या पर्यायाची चाचपणी सुरू केली आहे.

गोरेगाव पहाडी येथे कारशेड उभारणे, विविध ठिकाणी छोट्या-छोट्या स्वरुपाच्या कारशेड उभारणे, दक्षिण मुंबईत एक कारशेड उभारणे असे तीन पर्याय सध्या सरकारसमोर आहेत. सध्या हा कारशेडचा मुद्दा राजकीय बनला असून भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक सुरू आहे. परिणामी, लांबणाऱ्या कालावधीमुळे या प्रकल्पाची किंमत १० हजार कोटींनी वाढली आहे.

नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पदी आल्यानंतर त्यांनी कुलाबा-सिप्ज मेट्रो कारशेड आरे वसाहतीच्या बाहेर नेण्याचे आश्वासन दिले होते. जानेवारी २०२० मध्ये कारशेडसाठी पर्यायी जागेची चाचपणी करण्यासाठी अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने चार सदस्यीय समिती स्थापन केली होती.

आरे वसाहतीशिवाय इतर कोणताही पर्याय योग्य नसल्याचा अहवाल समितीने दिला होता. समितीने कांजूरमार्गचा पर्यायही नाकारला; मात्र तरीही ठाकरे सरकारने कारशेड कांजूरमार्ग येथे नेण्याची घोषणा केली. तसेच मेट्रो ३ (mumbai metro 3) आणि मेट्रो ६ (mumbai metro 6) साठी सामायिक कारशेड उभारली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कांजूरमार्गची जमीन मिठागराची असल्याचे सांगत केंद्र शासनाने या जमिनीवर मालकीचा दावा केला. त्यानंतर डिसेंबर २०२०मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कांजूरमार्गमधील कारशेडवर स्थगिती आणली. या प्रकल्पाच्या किंमतीत वाढ होण्यासाठी राज्य सरकार कारणीभूत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनीही कांजूरमार्गची जागा अडवल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली आहे. या विषयावर तोडगा काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला दिले आहेत.

तोडगा काय ?

राज्य सरकारने कारशेडसाठी गोरेगाव पहाडी येथील जागेचा विचार सुरू केला आहे; मात्र ही जागासुद्धा न्यायप्रविष्ट आहे. ही जागाही मिळत नसेल तर वांद्रे-कुर्ला संकुल येथील जागेचा विचार करावा लागेल; मात्र ही जागा महागडी आहे. काहीशे कोटींमध्ये जागा मिळू शकत असताना काही हजार कोटी का खर्च करावेत, असा प्रश्न सध्या सरकारसमोर आहे. विविध ठिकाणी छोट्या स्वरुपातील कारशेड उभारण्याचाही पर्याय स्वीकारल्यासही प्रकल्पाचा खर्च वाढू शकेल. केवळ कारशेडला विलंब होत असल्यामुळे 'मेट्रो ३'ला विलंब होत असल्याची शक्यता मात्र अधिकाऱ्यांनी नाकारली आहे. कारशेड उभी राहिली असती तरीही मेट्रो ३ सुरू होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे त्यांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT