patient  sakal media
मुंबई

मुंबई : पालिका रुग्णालयात अॅलर्जीच्या रूग्णांमध्ये 50 टक्के वाढ

शहरांत श्वास कोंडी वाढली, बदलत्या हवामानाचा परिणाम,

भाग्यश्री भुवड

मुंबई : तापमानात होणाऱ्या चढउतारामुळे (whether situation) शहरांत श्वास कोंडी वाढली (breathing issue) आहे. बदलत्या हवामानामुळे पालिका रुग्णालयात (bmc hospital) अॅलर्जीच्या रूग्णांमध्ये (Allergy Patients increases) 50 टक्के वाढ (Fifty percent) झाल्याचे तज्ज्ञ डाॅक्टर सांगतात. त्यामुळे, डॉक्टरांनी ज्येष्ठ नागरिकांसह मुलांना श्वसनाच्या आजारांपासून (breathing disease) सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

शहरातील दिवसा आणि रात्रीच्या तापमानातील तीव्र चढउतारांमुळे अॅलर्जी, व्हायरल इन्फेक्शन आणि श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे की, गेल्या पंधरवड्यात छातीच्या अॅलर्जीसह इतर अॅलर्जीच्या प्रकरणांमध्ये 40-45 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे, वैद्यकीय तज्ज्ञांनी मुंबईकरांना हंगामी संसर्गापासून सावध राहण्यास सांगितले आहे.

केईएम, लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल, डॉ आरएन कूपर म्युनिसिपल जनरल आणि बीवायएल नायर रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडीत), व्हायरल संसर्गाच्या रुग्णांमध्ये जवळपास 30-35 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. पालिका रुग्णालयांचे संचालक डॉ.  रमेश भारमल म्हणाले की, बहुतेक रुग्ण लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्यांना अॅलर्जीचा धोका आहे, त्यांनी प्रदूषित परिसरांतुन चालणे टाळावे, कारण वायू प्रदूषकांमुळे धोका निर्माण होतो.

वायू प्रदूषणात झालेली चिंताजनक वाढ श्वसनसंस्थेवर हल्ला करते. शिवाय, कार्बन मोनोऑक्साइडच्या उच्च पातळीचा थेट हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली आणि संपूर्ण श्वसनमार्गावर परिणाम होतो, विशेषत: लहान मुलांमध्ये हा संसर्ग जास्त प्रमाणात दिसतो. असेही डॉ भारमल म्हणाले. शिवाय, गर्भवती महिलांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे. तसंच, इतर रुग्णांना ताप, खोकला, घसा खवखवणे आणि अंगदुखी यासारखी लक्षणे हलक्यात न घेण्याचा इशारा दिला जात आहे.

संसर्गजन्य रोग तज्ञ देखील रुग्णांना स्वः उपचार पद्धती टाळण्याचा सल्ला देत आहेत. आमच्या ओपीडीमध्ये दररोज श्वसनाचा त्रास असलेले किमान दहा रुग्ण आढळतात. प्रत्येकाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसते, परंतु ज्यांना ताप असतो, सामान्यतः 100 अंशांपेक्षा जास्त ताप असतो अशांना दाखल करुन त्यांच्यावर करण्याची गरज भासते. इंट्राव्हेनस अँटीबायोटिक्स देऊन उपचार केले जातात असे केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

डॉक्टरांनी सांगितले की, हिवाळ्यात, प्रदूषक पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळ येतात, ज्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढते. यामुळे, अॅलर्जीचे रुग्ण वाढतात. सातत्याने वाहणारे नाक आणि डोळ्यांत पाणी येते. खोकला, घशाचा संसर्ग आणि न्यूमोनिया असे तात्काळ परिणाम होत असले तरी दीर्घकालीन परिणाम घातक असू शकतात कारण एखाद्याला फुफ्फुसाचा कर्करोग देखील होऊ शकतो असे सामान्य चिकित्सकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : पर्रिकर न सांगता फिरायचे तसे फिरा, पुण्यातील महिलेनं सल्ला देताच अजित पवार म्हणाले, कोण पर्रिकर? नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Heavy Rain: गेवराईत शनिवारी रात्री मुसळधार पाऊस; नदी नाल्यांचा पाणी ओसांडून अनेक गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे उत्पन्न धोक्यात

Kolhapur Crime : पहाटे चोरी करून रात्री थ्री स्टार हॉटेल मजा मारायची, लूटमारीचा चंगळवाद; CCTV मध्ये सापडताच पोलिसांनी केला कार्यक्रम

Mental Health: दर सात जणांपैकी एकाला मानसिक विकार; २०२१ मधील जगभरातील स्थिती, एक अब्ज जणांना त्रास, ‘डब्लूएचओ’ची माहिती

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

SCROLL FOR NEXT