मुंबई

'त्यांच्यामुळेच आज मी जिवंत आहे', भारतीय नौदलाचे आभार मानताना अश्रू अनावर

बोलण्यावरुनच तो किती भेदरलेला आहे, त्याने कुठल्या परिस्थितीचा सामना केलाय, ते स्पष्ट दिसत होते.

दीनानाथ परब

मुंबई: 'तौक्ते' चक्रीवादळाच्या (tauktae cyclone) तडाख्यात सापडून सोमवारी P-305 जहाज अरबी समुद्रात (arabian sea) बुडालं. या जहाजावरील २७३ पैकी १८४ जणांची भारतीय नौदलाने सुटका केली आहे. पण ८९ जण अजूनही बेपत्ता आहेत. या जहाजावरुन बचावलेल्या एका कर्मचाऱ्याशी माध्यमांनी संवाद साधला. त्यावेळी आपला अनुभव सांगताना त्या कर्मचाऱ्याला अश्रू अनावर झाले. (While thanking to indian navy P 305 employee cant stop his tears)

त्या कर्मचाऱ्याच्या बोलण्यावरुनच तो किती भेदरलेला आहे, त्याने कुठल्या परिस्थितीचा सामना केलाय, ते स्पष्ट दिसत होते. माध्यमाच्या प्रतिनिधीने ज्यावेळी या कर्मचाऱ्याला विचारलं, नौदलाने तुमची कशी मदत केली? त्यावर त्याने दिलेलं उत्तरच सर्वकाही सांगून जाते.

"त्यांचे खूप खूप आभार, त्यांच्यामुळे आज आम्ही जिवंत आहोत, नाही तर आज कोणीच वाचलं नसतं." अन्य सहकाऱ्यांबद्दल विचारलं, त्यावेळी त्यांची सुद्धा अशीच स्थिती असल्याचं त्या कर्मचाऱ्याने सांगितलं.

दोन दिवसांपूर्वी 'तौक्ते' चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून P-305 हे जहाज अरबी समुद्रात बुडाले. मुंबईपासून ३५ नॉटिकल माइल्स अंतरावर ही दुर्घटना घडली. P-305 जहाजाबद्दल माहिती मिळाल्यानंतर नौदलाने आपल्या विशेष युद्धनौका रवाना केल्या व मोठी बचाव मोहिम राबवली. नौदलाने P-305 जहाजावरील १८५ लोकांची सुटका केली. पण अजूनही काही जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. नौदलाला आतापर्यंत १४ मृतदेह हाती लागले असून ते सर्व मृतदेह मुंबई डॉकयार्डमध्ये आणण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT