Marathi-Number-Plate 
मुंबई

मराठीत क्रमांक असणाऱ्या वाहनांवर कारवाई का...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियमनुसार, मराठीत क्रमांक असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेशच नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नियम नसतानाही वाहतूक पोलिसांनी गेल्या 14 महिन्यांत सुमारे 667 दुचाकी वाहनांवर कारवाई करत तब्बल 17 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. राज्यात मराठी नंबर असलेल्या किती चारचाकी वाहनांवर कारवाई केली आहे, याचा तपशील मात्र वाहतूक विभागाकडे उपलब्ध नाही.

हौसेपोटी अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर दादा, नाना, आबा, राज अशा फॅन्सी मराठी नंबर प्लेट लावले जातात. मुंबई वाहतूक पोलिसांकडून मराठी नंबर प्लेट असलेल्या वाहनांकडून दंड वसूल करतेवेळी मात्र, दुजाभाव करण्यात येत असल्याचा धक्कादायक तपशील माहिती अधिकारात उघड झाला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने गोवर्धन देशमुख यांनी माहिती अधिकारात वाहतूक विभागाकडे मराठी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे राज्य शासनाचे आदेश असलेली प्रत मागिवली होती. याबाबतचा आदेश नसल्याचे उत्तर त्यांना सरकारने पाठविले आहे.

राज्यातील मराठी क्रमांक असणाऱ्या वाहनांवर केंद्र सरकारच्या मोटार वाहन अधिनियमानुसार कारवाई केली जाते. मात्र, ही कारवाई चुकीचे असल्याचे मत गोवर्धन देशमुख यांनी व्यक्त केले. 1988-89 मध्ये जो कायदा बनवण्यात आला, त्यातील कलम 50 नुसार वाहतूक पोलीस देत आहेत. मात्र, यात दंडाची रक्कम नमूद नाही. मग कोणत्या तरतुदीनुसार पोलीस 200 रुपये आकारतात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

सरकार जोपर्यंत मराठी क्रमांक असणाऱ्या वाहनांवर कारवाईचे आदेश देत नाही, तो पर्यंत वाहतूक पोलिसांनी कारवाई करू नये, अशी मागणी मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मराठीत क्रमांक असणाऱ्या वाहनांवर सतत होत असलेल्या कारवाईला आळा घातला पाहिजे, तसे पत्र संघटनेमार्फत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना देण्यात आले आहे. शिवाय राज्यात वाहनांवर मराठी क्रमांक टाकण्यास अधिकृत परवानगी शासनाने द्यावी, अशीही मागणी पत्रात केली आहे.

1 एप्रिल 2018 ते 31 मे 2019 या 14 महिन्यात वाहतूक पोलिसांकडून 667 दुचाकी वाहनांवर कारवाई केली गेली आणि 17 हजार 200 रुपये दंड वसूल केला गेला. राज्य सरकारने जर दंड आकारण्याचे आदेशच दिले नाहीत, मग केंद्र सरकारची तरतूद मान्य करायची की नाही? हा निर्णय राज्य शासनाला घेऊ द्या. राज्याचे स्वतःचे हक्क आहेत की नाही काही? सध्या यावर राज्य शासनाने कोणतेही आदेश दिलेले नसताना देखील वाहतूक पोलीस मराठीत क्रमांक असणाऱ्या वाहनांवर अनधिकृतरित्या कारवाई करत आहे.
- गोवर्धन देशमुख, कार्यकर्ता, महाराष्ट्र एकीकरण समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Caste Verification: महाराष्ट्रात जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी AI चा वापर होणार! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ब्लॉकचेन वापरण्याचे निर्देश

'खाशाबा'च्या टीझरमध्ये नागराज मंजुळेंना पाहिलंत पण त्यांच्या पत्नीला ओळखलंत का? २ सेकंदासाठी दिसलीय झलक

Pune Ashadhi Wari Sevavari: आषाढी वारीत पुणे महापालिकेची ‘सेवावारी’; स्वच्छता, सांस्कृतिक कार्यक्रम, लाखो वारकऱ्यांसह सामूहिक पसायदानाची तयारी

Khashaba Teaser : माजी खासदार संभाजीराजेंनी कोणत्या छत्रपतींची भूमिका साकारली? नागराज मंजुळे दिग्दर्शित चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

Pune Rain: पुणेकरांनो सावधान! पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढणार; घाट विभागाला रेड अलर्ट, अतिवृष्टीचा इशारा

SCROLL FOR NEXT