file photo 
मुंबई

कोरोनापासून आईही मुलाचे संरक्षण करू शकते...वाचा कोण म्हटलयं असं.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचा धोका वाढत असला तरी मुलाला जन्म देणारी आई स्वतःच्याच मुलाचे संरक्षण का नाही करु शकणार, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे. आई मुलाचा सांभाळ करु शकणार नाही, असा दावा करणाऱ्या वडिलांनाही न्यायालयाने फटकारले आहे.

दक्षिण मुंबईमध्ये गिरगाव परिसरात राहणाऱ्या पत्नीच्या विरोधात तिच्या नवऱ्याने याचिका केली आहे. पत्नी तिच्या आईबरोबर चाळीत राहते, तिथे सार्वजनिक स्वच्छताग्रुह आहे. अनेकजण त्याचा वापर करतात, वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार कोरोनाचा संसर्गाचा धोका तिथे अधिक आहे, असे वडिलांचे म्हणणे आहे. शिवाय चाळींमध्ये सोशल डिस्टन्सिंगही पाळले जात नाही, कोणीही कोणाकडे जात असते, पत्नीला मुलाची काळजी घेणे जमणार नाही, त्यामुळे किमान कोरोनाचा धोका असे पर्यंत तरी मुलाचा ताबा द्या, अशी मागणी याचिकेत वडिलांनी केली होती. 


वडिलांचा प्रशस्त फ्लॅट असून स्वतंत्र टॉयलेट आहे. त्यामुळे त्यांच्याकडे तो सुरक्षित असेल असा दावा त्यांनी केला होता. मात्र हा दावा न्या. रवी देशपांडे यांनी फेटाळला. जन्मदात्री आई मुलाचे कोरोनापासून संरक्षण का करणार नाही , असा उलट सवाल न्यायालयाने विचारला. असे कोणतेही कारण दिसत नाही कि आई मुलाची काळजी घेऊ शकत नाही. ती तिच्या मुलाची व्यवस्थित काळजी घेऊ शकते, असे स्पष्ट करत न्यायालयाने वडिलांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. मुलगा नऊ वर्षाचा असून सुट्टीच्या दिवशी वडिलांना भेटायची परवानगी कुंटुंब न्यायालयाने दिली आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पंजाब सरकारी कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानी मोर्चा

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

Mumbai News: मुंबईतील २५० अनधिकृत बांधकामांवर हातोडा, महापालिकेची धडक मोहीम

SCROLL FOR NEXT