मुंबई

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

Naseem Khan: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यात आतापर्यंत एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नसल्यामुळे नाराज असलेल्या नसीम खान यांनी स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Naseem Khan on Congress Lok sabha Election: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यात आतापर्यंत एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नसल्यामुळे नाराज असलेल्या नसीम खान यांनी स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात काँग्रेसने एकाही अल्पसंख्याक व्यक्तीस उमेदवारी का दिली नाही, या प्रश्नाचे उत्तर देण्यास माझ्याकडे शब्द नसल्याने मी प्रचारात भाग घेऊ इच्छित नाही, असे नसीन खान यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी आज आपली भूमिका व्यक्त केली आहे.

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील, तसेच इतर संघटनांनी एकही उमेदवार न दिल्याने त्यांचा रोष व्यक्त केला आहे. ते मला प्रश्न करत आहेत, तुम्ही पक्षाचे मोठे नेते आहात, महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष आहात, तुम्ही बंगाल, गुजरात, कर्नाटकासह अनेक राज्यात प्रचारासाठी जाता, मग महाराष्ट्रात एकही उमेदवार का दिलेला नाही. हा प्रश्न मला लोक करत आहेत, मी देखील या प्रश्नाशी सहमत आहे. अनेक भागात अल्पसंख्याक मतदार आहेत, एकाही मतदारसंघात अल्पसंख्यांक उमेदवार देण्यात आलेला नाही.

मी दोन टप्प्यात प्रचारासाठी गेलो, अनेक कामे केली, पण काँग्रेसने किंवा महाविकास आघाडीने ४८ पैकी कोणत्याही मतदारसंघात एकही अल्पसंख्याक उमेदवार दिलेला नाही असंही नसीम खान यांनी म्हटलं आहे. एमआयएमने दिलेल्या ऑफरबाबत बोलताना ते म्हणाले आत्तापर्यंत दिलेली सर्व जबाबदारी मी पुर्ण केली आहे. मी कोणताही असा निर्णय घेणार नाही त्यामुळे पक्षाला नुकसान होईल असंही ते पुढे म्हणाले आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले, परवा पर्यंत सर्वांना विश्वास होता की, काँग्रेस पक्ष कोणाला तरी उमेदवारी देईल, पण कोणाला दिली नाही, त्यानंतर लोंकामध्ये रोष निर्माण झालं, एक वेगळं वातावरण निर्माण झालं आहे. महाराष्ट्रात अनेक मोठे नेते आहेत त्यातील एकाही नेत्याला उमेदवारी देण्यात आलेली नाही. पक्षांनी दिलेल्या सर्व जबाबदारी मी पार पाडल्यात काल पर्यंत समजाला वाटलं होत कुठे ना कुठे उमेदवारी मिळेल पण तसं झालं नाही. राज्यात अनेक नेते आहेत कोणाला ना कोनाला उमेदवारी मिळायला पाहिजे होती. पक्षाच्या नेतृत्वाने विचार करणं गरजेचं आहे, असंही ते यावेळी म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT