corona 2.jpg 
मुंबई

मुंबईत पुन्हा कोरोना संसर्ग वाढण्याचे कारण काय?

सकाळवृत्तसेवा

मुंबई: लोकांमध्ये जी कोरोनाची भीती एका वर्षात होती ती आता कमी झालेली पाहायला मिळते. नियमांचे पालन करणे, मास्क घालणे, शारिरीक अंतर पाळणे, वारंवार हात धुणे अशा गोष्टींचे पालन न झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. शिवाय, सर्व सुविधा सुरू झाल्या आहेत. जसे की, लोकल, बस, मॉल्स, दुकाने आणि इतर सर्वच गोष्टी पूर्वपदावर आल्या आहेत. त्यामुळे, लोकांची ये-जा वाढली आहे. परदेशातूनही लोक मुंबईत दाखल होत आहेत. याचा सर्वात जास्त फटका बसला आहे. तर, सध्याची परिस्थिती ही सप्टेंबर महिन्यासारखी झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात केसेस मुंबईत सापडत होते. पण, मार्चमध्येच ही परिस्थिती उद्भवल्याने लोकांनी काळजी आणि संपूर्णपणे सुरक्षा घेणे आवश्यक आहे.

मिशन बिगेन अंतर्गत सर्व सुविधा सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. लोकल सेवा, बस सेवा सुरू आहे. व्यावसायिक आस्थापना अशा सर्व गोष्टींमुळे लोकांचे येणे- जाणे वाढले आहे. शिवाय, भेटीगाठीचे कार्यक्रम वाढले आहेत. परदेशातून येणार्या नागरिकांची येजा वाढली आहे. त्यातुन रुग्ण वाढत आहेत. भीती कमी झाली आहे. रुग्ण संख्या वाढत असली तरी 82 टक्के रुग्ण लक्षणविरहीत पॉझिटिव्ह आहेत. मृत्यूदर कमी असून 0.5 टक्के एवढाच आहे. सरासरी तो 3.35 आहे पण, मृत्यूदर कमीच आहे.

लॉकडाऊनची गरज आहे का ?
सध्या संपूर्णपणे लॉकडाऊनची गरज नाही. पण, राज्य सरकारने लागू केलेले सर्व निर्बंध लोकांनी काटेकोरपणे पाळले तरी लॉकडाऊनची गरज भासणार नाही. जर लोकांचे सहकार्य मिळाले नाही तर मर्यादित निर्बंध आणखी कडक होऊ शकतात.

ट्रेन,मॉल,मैदाने,चौपाट्यांवर बंदीची गरज वाटते का ?
ट्रेन,मॉल,मैदाने, चौपाट्यांवर बंदीची गरज नाही. पण, क्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच परवानगी द्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. मॉल्समध्ये ही चाचण्या सुरू आहेत. चौपाट्यांवर आता रात्री 8 नंतर जाण्यास मनाई केली आहे. शिवाय, 5 जणांनी एकत्र कुठेही फिरु नये. अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जर रुग्णसंख्या नियंत्रणात आली नाही तर आणखी कडक उपाययोजना राबवली जाऊ शकते.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू! एसटीला पसंती, बसस्थानकांवर प्रचंड गर्दी

Rohit Sharma: One Last Time! रोहितने सिडनीतून केलं ऑस्ट्रेलियाला अलविदा, सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

Latest Marathi News Live Update : लासलगावला डम्पिंग ग्राउंडच्या समस्येतून दिलासा

Chhattisgarh Naxalite Surrender : छत्तीसगडमध्ये या वर्षांत तब्बल दोन हजारांहून अधिक नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण!

Fraud Case: एपीएमसीत विमा फसवणूक प्रकरण उघड! नावसाधर्म्याचा गैरफायदा घेऊन पॉलिसी रक्कम लाटली

SCROLL FOR NEXT