file photo 
मुंबई

मुंबईच्या महापौर का झाल्या नाराज?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महापौर म्हणजे शहराचे प्रथम नागरिक. शहरातील प्रत्येक शासकीय सोहळ्यात त्यांना मानाचे स्थान असते; पण आज मध्य रेल्वेच्या कार्यक्रमात महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने त्या आल्या पावली परतल्या. नाराजी व्यक्त करून त्या कार्यक्रमाच्या ठिकाणाहून निघून गेल्याने चर्चेला उधाण आले होते.

हेही वाचा : ...म्हणून पहिल्याच दिवशी उशीरा धावली एसी लोकल

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या संदर्भात भाषणात नाराजी व्यक्त केल्यानंतर रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दिलगिरी व्यक्त केली. अशी चूक पुन्हा होणार नाही, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. 

मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल ते ठाणेदरम्यान पहिली एसी लोकल गुरुवारपासून (ता. 30) सुरू झाली. या लोकलचे रेल्वे राज्यमंत्री अंगडी यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उद्‌घाटन केले. या कार्यक्रमाला राजशिष्टाचाराप्रमाणे महापौरांनाही निमंत्रित करण्यात आले होते; पण व्यासपीठावर लावण्यात आलेल्या फलकावर; तसेच आसनासमोरील डायसवरही महापौरांचे नाव नव्हते. हे पाहून महापौर पेडणेकर नाराज होऊन निघून गेल्या. नंतर अरविंद सावंत यांनी हा प्रकार राज्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिला.

हेही वाचा : धक्कादायक : ट्रेलरच्या धक्क्याने पादचारी पूलच कोसळला

ही वातानुकूलित लोकल जेथून सुटते, त्या रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीचेही नाव मंचावर नाही. एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर बांधण्यात आलेल्या पुलासाठी मी अनेक वेळा पुढाकार घेऊनही या पुलावर कुठेही त्याचा उल्लेख नाही. रेल्वे अधिकारी वारंवार लोकप्रतिनिधींचा अपमान करीत असून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी सावंत यांनी केली; मात्र कारवाईचे कोणतेही आश्‍वासन न देता राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Boycott: विकासाच्या बदल्यात फसवणूक? नवी मुंबईतील २७ गावांचा निवडणूकीवर बहिष्कार, राजकारण्यांच्या आश्वासनांचा अखेर कंटाळा

PM मोदी ख्रिसमसनिमित्त गेले चर्चेमध्ये, प्रभू येशूसमोर केली प्रार्थना; पाहा Video

धक्कादायक! पतीच्या छळाला कंटाळून नवविवाहितेनं घेतला गळफास; महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न, नवऱ्यानं असं काय केलं?

CM Yogi Adityanath: दूरदृष्टीचा नेता आणि कवी मनाचा पंतप्रधान..! अटलजींच्या जन्मशताब्दीनिमित्त CM योगी आदित्यनाथ यांनी सांगितली आठवण

Ichalkaranji Election : दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही; मात्र इचलकरंजीत अर्जांसाठी प्रचंड झुंबड

SCROLL FOR NEXT