मुंबई

राजकारण्यांच्या तक्रारींची दखल तातडीने घेता तशी सामान्यांच्या तक्रारींची का नाही? उच्च न्यायालयाचा BMC ला सवाल

सुनिता महामुनकर


मुंबई : धोबीतलाव येथील अनधिकृत बांधकामावर तातडीने केलेल्या पाडकामाच्या कारवाईबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय व्यक्तींंच्या तक्रारींची दखल जितक्या जलदीने घेता तशी सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची दखल का घेत नाही, असा परखड प्रश्न खंडपीठाने केला.

दक्षिण मुंबई मध्ये मागील पन्नास वर्षांपासून असलेल्या ललित बार आणि रेस्टॉरंट विरोधात शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी तक्रार केली आहे. संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या तक्रारीवर महापालिकेने काही दिवसांपूर्वी पाडकामाची कारवाई सुरू केली आहे. याविरोधात रेस्टॉरंट मालक ललित डिसोझा यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर न्या शाहरुख काथावाला आणि न्या माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. हौटेलचे बांधकाम नियमानुसार आहे. सन 1960 मध्ये मूळ बांधकाम असून सन 1973 मध्ये तेथे हौटेल सुरू करण्यात आले, अशी माहिती याचिकादाराकडून देण्यात आली. 

आरोग्य समितीचे अध्यक्ष घोले यांनी मागील वर्षी डिसेंबर मध्ये यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यावर पाहणी केल्यानंतर मार्चमध्ये रेस्टॉरंटला नोटीस बजावण्यात आली, असे महापालिका च्या वतीने सांगण्यात आले. मात्र महापालिकेने नोटीस चिकटवली आणि लौकडाऊनमुळे खुलासा करता आला नाही, असा युक्तिवाद याचिकादाराकडून करण्यात आला. तसेच महापालिकेने अद्याप तक्रारींची प्रतही दिली नाही, असेही खंडपीठाला सांगितले.

खंडपीठाने या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. पन्नास वर्षानंतर नगरसेवकाने तक्रार केल्यावर बांधकाम अवैध असल्याचे कळले का, तोपर्यंत प्रशासन काय करत होतं, असा सवाल खंडपीठाने केला. न्यायालयाने अंतरिम आदेशाद्वारे पालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली असून सुनावणी दोन आठवड्यानंतर निश्चित केली आहे.

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fadnavis on Thackeray Unity : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर फडणवीस काय म्हणाले? 'ठाकरेंचा ट्रॅक रेकॉर्ड भ्रष्टाचाराचा'

Vijay Hazare Trophy : ८ चौकार, ८ षटकार... रोहित शर्माने झळकावले खणखणीत शतक; ७ वर्षांनी परतला अन् वादळासारखा घोंगावला...

MP Supriya Sule : लोकशाहीमध्ये नाराजी चालत नाही, महाविकास आघाडी-राष्ट्रवादीसमवेतच निवडणूक लढण्याचा प्रयत्न

VIJAY HAZARE TROPHY : पहिली धाव अन् विराट कोहलीच्या नावावर मोठा पराक्रम; सचिन तेंडुलकरनंतर असा विक्रम करणारा भारतीय

BMC Election: शरद पवारांच्या पक्षाने फुंकली ‘तुतारी’! महापालिकांसाठी निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

SCROLL FOR NEXT