local train sakal media
मुंबई

लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी का नाही? हायकोर्टाचा सवाल

तर लसीचे दोन डोस घेण्याचा उपयोग काय? असा सवाल मुख्य न्यायमुर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमुर्ती जीएस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने विचारला आहे.

दीनानाथ परब

मुंबई: कोरोना प्रतिबंधक लसीचे (covid preventive vaccine) दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकल प्रवासाची (local travel) परवानगी का देत नाहीय? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) महाराष्ट्र सरकारला (Maharashtra govt) विचारला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेतल्यानंतरही नागरिकांना घरातच थांबावे लागणार असेल, तर लसीचे दोन डोस घेण्याचा उपयोग काय? असा सवाल मुख्य न्यायमुर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमुर्ती जीएस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने विचारला आहे.

सर्व वकील, न्यायालयीन क्लार्क आणि कोर्ट कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अनुत्सुक असल्याचे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी कोर्टात सांगितले. त्यावेळी खंडपीठाने लसीचे दोन डोस घेण्याचा उपयोग काय? असा सवाल विचारला.

लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. कोरोनाची साथ सुरु होण्याआधी दिवसाला ७५ लाख नागरिक लोकलने प्रवास करायचे. सध्या फक्त कोरोना योद्धे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी आहे.

वकील आणि खासगी व्यक्तींनी दाखल केलेल्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालय सुनावणी करत होते. कामकाजासाठी वकीलांना लोकल आणि मेट्रो रेलने प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Board Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! बोर्ड परीक्षांचे 'फायनल' वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेपासून परीक्षा सुरू

Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जच्या डोळ्यांमध्ये अश्रू; ऑस्ट्रेलियावरील ऐतिहासिक विजयानंतर भावुक

Kolhapur Faermers : ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण आल्यास कठोर कारवाईचा शिरोळ पोलिसांचा इशारा

Chh. Sambhajinager Crime: भाजी विक्रेत्यावर सपासप वार; तोंडाला रुमाल बांधून फिल्मी स्टाइल हल्ला करीत घेतला जीव

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगड दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT