मुंबई

पतीची हत्या करून नैसर्गिक मृत्यूचा बनाव

सकाळवृत्तसेवा

मुंबई - पतीचे तोंड दाबून हत्या करून तो नैसर्गिक मृत्यू असल्याचे दाखवल्याचा प्रकार ट्रॉम्बे चिताकॅम्प येथे गुरुवारी घडला. गंभीर बाब म्हणजे आरोपी पत्नीने पतीचा दफनविधीही करण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच ट्रॉम्बे पोलिसांनी हस्तक्षेप करून शवविच्छेदन केले, त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मृत व्यक्तीची पत्नी, सासू व मेव्हणीला पोलिसांनी अटक केली आहे. 

रहिम खान (३६) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो चिता कॅम्प येथील बी लाईनमधील रहिवासी होता. रहिमला दारूचे व्यसन असल्यामुळे तो पत्नी बिल्कीस बानोसोबत नेहमी वाद घालायचा. त्याला कंटाळून गुरुवारी पत्नी बिल्कीस बानोने आई सलमा व बहीण ताजुनीसा खान यांच्यासमवेत रहिमचे तोंड दाबून हत्या केली. तसेच परिसरातील एका डॉक्‍टरला हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगून मृत्यू प्रमाणपत्र घेतले. त्यानंतर रहिमचा दफनविधीही करण्यात येणार होता; पण पोलिसांना या सर्वाची कुणकुण लागली. त्यामुळे ट्रॉम्बे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन विधी थांबवले व रहिमचा मृतदेह विच्छेदनाला पाठवला. त्यावेळी शवविच्छेदन अहवालात रहिमचे तोंड दाबून त्याची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या प्रकरणी तिघींनाही अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रहिमच्या डोक्‍याच्या मागे जखम होती. त्यामुळे मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा संशय निर्माण झाला. त्यातून आरोपींचे बिंग फुटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT