कोणी पैसे काढून देईल का? ... डोंबिवलीकरांची आर्त हाक 
मुंबई

कोणी पैसे काढून देईल का? ...डोंबिवलीकरांची आर्त हाक

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यास महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. डोंबिवलीतील आयरेगावातील नागरिकही दोन दिवस सतत खेपा मारुन पोलिसांना पैसे काढण्यासाठी जाऊ द्या अशी विनवणी करीत आहेत. परंतू त्यांना त्यासाठीही दुसऱ्या भागात जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने आम्हाला कोणी खात्यातून पैसे काढून देईल का? अशी मागणी नागरिक करु लागले आहेत. 

डोंबिवलीतील आयरे गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे  या भागात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. शुक्रवारपासून या भागातील नागरिकांना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शनिवारी महापालिका प्रशासनाकडून विभागातील दुकानदारांची यादी नागरिकांना समाज माध्यमावर पाठविण्यात आली असून आता घरातून किराणा व इतर अत्यावश्यक वस्तू मागविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही नागरिक तरीही दुकानात सामान खरेदी करण्यास जात असल्याचे दिसले. परंतू दुकानदारांनीच त्यांना दुकानाचा फोन नंबर देत यावरच सामान मागवा अशी विनंती करत पुन्हा पाठवित आहेत. नियमांचे पालन सारेच करीत आहेत, परंतू यामुळे उपाशी रहावे लागेल अशी चिंता आता आयरेवासियांना सतावू लागली आहे. 

शुक्रवारी एटीएममधून पैसे काढण्यास गेलो, परंतू मला जाऊ दिले नाही. गावात एटीएमची सुविधा नाही, एटीएम दुसऱ्या परिसरात आहे. पैसेच नाही हातात तर सिलेंडरचे पैसे कोठून द्यायचे, किराणा कसा आणायचा याचे टेन्शन आले आहे. 
- रोशन पवार, ग्रामस्थ.

 या भागात एटीएमटी सुविधा देणारी गाडी आणावी, मुंबईत तसे प्रयोग झाले आहेत मग येथेही करा, कोणाकडे उधारही मागता येत नाही, आज प्रत्येकालाच अडचण आहे.
- राकेश सावंत, ग्रामस्थ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी, सर्वच मराठ्यांना आरक्षण मिळालं; मनोज जरांगेंनी पुन्हा ठामपणे सांगितले

ENG vs SA: मॅजिकल कॅच! दोन बोटांनी चेंडू झेलायला गेला, तो निसटला अन्... Joe Root लाही विश्वास नाही बसला Video

Latest Maharashtra News Updates : "मला फक्त एवढेच सांगायचे आहे की शुल्क लादणे ही चांगली गोष्ट नाही"- राम दास आठवले

Marathi Serial : 'थोडं तुझं..' नंतर फक्त 9 महिन्यात या मालिकेचं शटर बंद ! मालिकांच्या वेळेतही महत्त्वपूर्ण बदल

Jalna Scam : अन्य खात्यांवर वळविला पैसा, अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरण; आर्थिक गुन्हे शाखेकडून माहिती संकलन सुरू

SCROLL FOR NEXT