मुंबई पालिकेकडून लवकरच जन्म, मृत्यू दाखला ऑनलाईन मिळणार? 
मुंबई

मुंबई पालिकेकडून लवकरच जन्म, मृत्यू दाखला ऑनलाईन मिळणार?

समीर सुर्वे

मुंबई : जन्म-मृत्यू दाखला तयार करणे, त्यात सुधारणा करण्याची प्रक्रिया ऑनलाईन होण्याची शक्‍यता आहे. तसेच जन्म आणि मृत्यू दाखल्यावरील माहिती दर्शवण्यासाठी मराठी इंग्रजीसह हिंदी उर्दू तसेच इतर भारतीय भाषांचा समावेश होण्याची शक्‍यता आहे.

जन्म-मृत्यूच्या दाखल्यांसाठी मुंबई महापालिकेत प्रत्यक्ष जाऊन अर्ज भरावा लागतो. यात नोकरदारांचा बराच वेळ खर्ची जातो. याशिवाय या दाखल्यांवरील चुका दुरुस्तीसाठीही बराच वेळ जातो. यावर उपाय म्हणून अर्ज भरण्याची पद्धत ऑनलाईन करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली. याबाबत त्यांनी आज अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांच्यासोबत बैठक घेतली. ककाणी यांनी यासंदर्भात 14 दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. 

पालिकेने 2007 पासून संगणकीय दाखले देण्यास सुरवात केली. त्यापूर्वीचे दाखले हे लिखित स्वरूपात होते. त्यामुळे 2007 पूर्वीचा दाखला हवा असल्याच बरीच उठाठेव करावी लागते. याबाबतही तोडगा काढण्याची मागणी शेख यांनी केली आहे. 
---------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी कबड्डीचा खेळाडू! इतरांप्रमाणे मलाही न्याय....; नाराजीच्या चर्चेवर भुजबळ काय म्हणाले?

Kolhapur Bullock Cart Race : पश्चिम महाराष्ट्रात बैलगाड्यांचा थरार! 82 गाड्यांचा सहभाग; कोल्हापूरच्या 'सतेज-ऋतू' शर्यतीत कोण जिंकला ट्रॅक्टर? वाचा विजेत्यांची यादी

Latest Marathi News Live Update : विधवा, मयत आणि दिव्यांग शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा- बच्चू कडू

2G Ethanol Uses : शेतीतील कचऱ्यापासून तयार होणार नवे इंधन! 2G इथेनॉलमुळे शेतकऱ्यांसह कोणकोणत्या क्षेत्राला फायदा?

Pune PMP Bus Service: घराबाहेर पडताच पाच मिनिटांत बस; पीएमपीचे ‘ट्रिपल फाइव्ह’ मॉडेल, वर्षअखेर १७१५ नवीन बस दाखल होणार

SCROLL FOR NEXT