कामगारांअभावी एमएमआरडीए प्रकल्पांचा वेग मंदावणार? 
मुंबई

कामगारांअभावी एमएमआरडीए प्रकल्पांचा वेग मंदावणार?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीएच्या) विविध प्रकल्पांवरील सुमारे तीन चतुर्थांश मजुरांनी मूळ गावी जाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पांचा वेग मंदावण्याची शक्‍यता आहे. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात 16 हजारांपर्यंत असलेली मजुरांची संख्या मे महिन्याच्या अखेरीस 3500 इतकी कमी झाल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.

सध्या एमएमआरडीएतर्फे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू असून, त्यामध्ये सहा मेट्रो मार्गिका, मुंबई पारबंदर प्रकल्प आणि उड्डाणपुलांचा समावेश आहे. मेट्रो प्रकल्पांवर 5444, एमटीएचएलसाठी 5042, इतर प्रकल्पांसाठी 576 मजूर काम करत आहेत. कामे ठप्प झाल्यावर या मजुरांची निवास, जेवण व वैद्यकीय अशी सर्व व्यवस्था प्रकल्पांच्या स्थळाजवळच करण्यात आली होती. त्याचा खर्च एमएमआरडीएतर्फे करण्यात आला होता. 

20 एप्रिलपासून एमएमआरडीएची कामे पुन्हा सुरू झाली. त्यावेळी सर्व प्रकल्पांवर मजुरांची पूर्ण उपस्थिती होती. कामाला वेग आल्यानंतर ही संख्या 16 हजारांपर्यंत गेली होती; परंतु मे महिन्याच्या अखेरीस केवळ साडेतीन हजार मजूरच उपस्थित असल्याचे एमएमआरडीएने सांगितले. परतीच्या प्रवासात कोरोनाची लागण होऊ शकते, असे सांगत कंत्राटदार गावाकडे जाणाऱ्या मजुरांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : आखाती युद्धाचा फटका; टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत

Nanded Student Protest: शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात नांदेडमध्ये ‘अभाविप’चा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

SCROLL FOR NEXT