File Photo 
मुंबई

मुंबईत आज शाळा भरणार..., पण शिक्षकांविना!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ आल्या असतानाच मुंबईतील शाळांमध्ये शनिवारी (ता. 8) शिक्षकांचा शुकशुकाट आढळण्याची शक्‍यता आहे. भाजपप्रणीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारती या दोन्ही संघटनांची अधिवेशने मुंबईत होत आहेत. त्यासाठी शेकडो शिक्षक अर्जित रजा घेणार असल्याचे समजते.

शिक्षक भारती आणि शिक्षक परिषद यांच्या अधिवेशनांना उपस्थित राहण्यासाठी शिक्षकांना अर्जित रजा देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. अधिवेशनाला सर्वाधिक शिक्षक उपस्थित राहावेत, यासाठी या संघटनांनी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे शनिवारी शहर आणि उपनगरांतील शाळांमधील बहुतेक शिक्षक दोन्ही अधिवेशनांना हजर राहतील. दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना अधिवेशने घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करणे योग्य नसल्याचे अनेक शिक्षक खासगीत बोलत आहेत.

शिक्षक भारतीचे अधिवेशन शनिवारी वडाळा येथील नायगाव क्रॉस रोडजवळील मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे भारतीय क्रीडा मंदिर स्टेडियम येथे होत आहे. या अधिवेशनाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आदी मान्यवर उपस्थित राहतील. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई विभागीय अधिवेशन माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात होत आहे. या अधिवेशनाला माजी शिक्षणमंत्री आशीष शेलार, साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, शिक्षक आमदार नागो गाणार आदी उपस्थित राहणार आहेत.

Will schools be filled in Mumbai today but without teachers?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय- हर्षवर्धन पाटील

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT