Within two hours, Rs 2.25 lakh has been withdrawn from the trader's account. 
मुंबई

चारशे रुपयांच्या नादात बसला सव्वा दोन लाखाचा फटका

सकाळवृत्तसेवा

मुंबई: बोरिवलीमध्ये राहणाऱ्या एका व्यापारीने ऑनलाईन पद्धतीने 400 रुपये किमतीचे दोन चिवड्याचे पॅकेट ऑर्डर केले असताना त्याला ते मिळाले नाही. त्याचे स्टेट्स जाणून घेण्याच्या नादात त्याला ऑनलाईन पद्धतीने 2.25 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. 

कशी घडली घटना: 

मुंबईतील बोरिवली भागात राहणाऱ्या एक व्यापारीने 22 एप्रिलला खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या एका ऑनलाईन पोर्टलवरून 400 रुपये किमतीचे दोन चिवड्याचे पॅकेट ऑर्डर केले होते. ते चिवड्याचे पॅकेट त्याला 1 मे पर्यंत न मिळाल्याने त्याने गुगलवर त्या ऑनलाईन पोर्टलचा हेल्पलाईन नंबर शोधण्यास सुरवात केली. त्याचवेळी ऑनलाईन गंडा घालणाऱ्या टोळीकडून गुगलवर अपलोड करण्यात आलेला हेल्पलाईन नंबर त्या व्यापाऱ्याला दिसला आणि त्याने त्यांच्याशी संपर्क केला. ऑनलाईन गंडा घालणाऱ्या टोळीकडून त्या व्यापारीला त्याच्या बँकेच्या अकाउंट नंबर, मोबाईल क्रमांक, एटीएम कार्ड क्रमांक आणि सीवीवी क्रमांकाची विचारणा करण्यात आली. व्यापाऱ्याकडून हि माहिती मिळाल्यानंतर त्या ठगांनी त्याच्या मोबाईल क्रमांकावर एक लिंक पाठवून ती दुसऱ्या क्रमांकावर पाठविण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्या व्यापाऱ्याला युपीआय पिन आणि ओटीपीची विचारणा करण्यात आली. व्यापाऱ्याकडून ओटीपी मिळाल्यानंतर पुढच्या दोन तासातच त्या व्यापाऱ्याच्या खात्यातून सव्वा दोन लाख रुपये काढण्यात आले आहे.

पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन:
या व्यापारीने बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये 2 मेला या ऑनलाईन गंडा घालणाऱ्या टोळी विरोधात तक्रार दाखल केली आहे. सायबर पोलीसचे डीआयजी हरीश बैजल यांनी लॉकडाऊन काळात ऑनलाईन गंडा घालणारे नवनवीन पद्धतीचा वापर करून गंडा घालत असल्याचे सांगितले. त्यांनी नागरिकांना ऑनलाईन व्यवहार करताना विशेष खबरदारी घेण्याचे आव्हान केले आहे. पोलिसांकडून वेळोवेळी सोशल मीडियावर नागरिकांना सतर्क करण्यात येत असते. 

ऑनलाईन फसवणुकीपासून कसे वाचाल ? 

ऑनलाईन किंवा कोणत्याही पद्धतीने आपल्या एटीएम कार्डचा क्रमांक व आपला सीवीवी क्रमांक कोणाशीही शेयर करू नका. कोणी बँकेचा अधिकारी म्हणून किंवा कोणत्याही प्रकारचा अधिकारी म्हणून आपल्याला सीवीवी क्रमांक आणि ओटीपीची मागणी केली तर त्याला ती देऊ नका व त्याची तक्रार आपल्या जवळील पोलीस स्थानकात किंवा सायबर पोलिसांना मेल द्वारे करावी. शक्यतो कोणत्याही अनधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पेमेंट करणे टाळावे. आपण ऑनलाईन पेमेंट करत असताना सुरवातीला त्या संकेतस्थळाची माहिती तपासून घेऊन मगच पेमेंट करावे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT