मुंबई : मोबाईल मध्ये आरोग्य सेतू एप नसेल तर नागरिकांना सेवा आणि लाभ नाकारता येणार नाही, असा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. आरोग्य सेतू नसल्यामुळे पारपत्र कार्यालयात प्रवेश नाकारला,. असे याचिकेत म्हटले आहे.
मालाडमधील तान्या महाजन यांनी एड अदिती सक्सेना यांच्यामार्फत न्यायालयात याचिका केली आहे. त्यांचे पारपत्र नूतनीकरण करण्यासाठी त्यांनी नियोजित वेळ घेऊन मालाड पारपत्र कार्यालयात गेल्या होत्या. मात्र तेथील सुरक्षा रक्षकाने त्यांच्याकडे आरोग्य सेतू एप आहे का याची विचारणा केली आणि ते सुरू करायला सांगितले. यावर त्यांनी पारपत्र अधिकार्याना इंटरकौमवर संपर्क केला. मात्र हा एप सक्तीचा आहे असे उत्तर त्यांना देण्यात आले.
आरोग्य सेतू ऐच्छिक आहे असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच त्याचा वापर करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करा असे सुचवले आहे. परंतु त्याची सक्ती करण्याचे बंधन नाही, असा युक्तिवाद याचिकादिराकडून करण्यात आला आहे. आरोग्य सेतू मधून व्यक्तिगत माहिती दिली जाते, असे सांगण्यात येते. त्यामुळे अनेकांनी या ऐपला विरोध केला आहे. शासकीय कामात याची सक्ती करु नये, आणि नागरिकांना सेवा द्यावी अशी मागणी याचिकेत केली आहे.
केंद्र सरकार आणि पारपत्र कार्यालयाने यावर खुलासा करावा, असे निर्देश न्या उज्जल भूयान यांच्या खंडपीठाने दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी ता. 7 जानेवारी रोजी होणार आहे.
without Aarogya Setu App Citizens services and benefits cannot be denied High Court
--------------------------------------------------------
संपादन - तुषार सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.