File Photo 
मुंबई

कुटुंबासोबत माहेरी निघालेल्या महिलेचा अपघातात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : पत्नी व मुलाला घेऊन सासुरवाडीला निघालेल्या दुचाकीस्वाराला अज्ञात आयशर ट्रकचालकाने हुलकावणी दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर बसलेली महिला ठार, तर दहा वर्षीय मुलगा व दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना भिवंडी-ठाणे मार्गावरील खारेगांव पुलावर शनिवारी घडली.

शर्मिला पुजारी (34, रा. जूचंद्र, वाकीपाडा, ता. वसई) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला पती ईश्‍वर व मुलगा दर्शन यांच्या सोबतीने दुचाकीवरून कल्याण येथील माहेरी जात होते. त्यांची दुचाकी खारेगाव पुलावर असताना पाठीमागून भरधाव वेगातील आयशर ट्रकने हुलकावणी दिली.

त्यावेळी दुचाकी रस्त्यावर पडल्याने शर्मिला यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे; तर पती ईश्‍वर व मुलगा दर्शन हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पराग भाट करीत आहेत.

A woman dies in an accident

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

SCROLL FOR NEXT