dadar terminus 
मुंबई

काळ आला होता पण वेळ नाही; दादर रेल्वे स्थानकातील थरारक प्रसंग

मोबाइल चोराला पकडताना सुदैवाने महिला...

सुरज सावंत

मुंबई: मागच्या काही दिवसात मुंबईत लोकल प्रवास (Mumbai local travel) महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. मुंबईत लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. पण तरीही महिलांविरोधात गुन्हे घडतच (crime against women) आहे. आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी कळवा रेल्वे स्थानकात एका महिलेला मोबाइल चोरामुळे (Mobile thief) आपले प्राण गमवावे लागले होते. अगदी तशाच प्रकारची घटना पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात (western railway dadar) घडली. सुदैवाने मोबाइल चोराचा पाठलाग करणाऱ्या महिलेचे प्राण वाचले. रेल्वे पोलिसांनी चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Women injured while catching mobile thief incident happened at dadar railway station)

दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 4 वर गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. विरार वरून सुटलेली लोकल संध्याकाळी पावणे पाचच्या दरम्यान दादर स्थानकात आली. याच लोकलमध्ये स्नेहल हूलके नावाची महिला प्रवास करत होती. पण तिच्या नकळत मागून येऊन एका व्यक्तीने तिच्या हातातला मोबाईल घेतला आणि धावत्या ट्रेनमधून खाली उतरला.

मोबाइल गेल्याचे लक्षात येताच स्नेहल देखील त्याच्या मागे धावली मात्र तिने पाय बाहेर टाकताच प्लॅटफॉर्म संपल्याने ती थेट रुळांवर पडली. तिचे सुदैव म्हणावे लागेल म्हणून ती लोकलच्या चाकाखाली आली नाही. मात्र या घटनेत तिला गंभीर दुखापत झाली आहे.

पोलिसांनी ही घटना लक्षात येताच त्यांनी त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले पण ताबडतोब आरोपीचा शोध सुरू केला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने 2 तपास पथकांनी 3 तासात राहुल बुटिया या आरोपीला अटक केली. त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून 17 हजारांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandu Andekar House Raid : पुणे पोलिसांकडून बंडू आंदेकरच्या घराची झडती, कोट्यवधींचं घबाड सापडलं...

मोठी बातमी! फेब्रुवारी ते ११ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांचे २३९९ कोटींचे नुकसान; १९.४८ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात, तरी सरकारकडून मिळाली नाही दमडीचीही मदत

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2025

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा 'Veggie Pancakes', सोपी आहे रेसिपी

आनंदाची बातमी! 'राज्यात एक लाख काेटींची गुतवणूक'; कोकण, नाशिक अन् विदर्भात ४७ हजार रोजगार निर्माण होणार, मुख्यमंत्र्यांची सामंजस्य करारावर स्वाक्षरी

SCROLL FOR NEXT