नवी मुंबईतील ‘या’ पार्कचा होणार कायापालट! मिळाली ही मंजूरी... 
मुंबई

नवी मुंबईतील ‘या’ पार्कचा होणार कायापालट! मिळाली ही मंजूरी...

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने 38 कोटी रुपये खर्च करून नेरूळ येथे वंडर्स पार्क उभारले आहे. मात्र, या वंडर्स पार्कमध्ये बसवण्यात आलेले राईडस या नादुरुस्त झाल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड होत होता. यामुळे वंडर्स पार्कमधील राईड्‌स बदलण्यासह, काही फेरबदल करण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत पटलावर ठेवण्यात आला होता. या वंडर्स पार्कसाठी पालिकेकडून 27 कोटी 25 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. 

नवी मुंबईतील वंडर्स पार्कमध्ये बसवण्यात आलेल्या राईडसचे आयुष्यमान संपुष्टात आले असून, सद्यस्थितीमध्ये काही राईड्‌स सुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर काही राइड्‌स या वारंवार नादुरुस्त होतात. त्यामुळे वंडर्स पार्कमधील राईड्‌स बदलण्यात येणार आहे. वंडर्स पार्कमधील संगीतमय कारंजे, प्रेक्षागृहाची दुरुस्ती, वॉटर बॉडीला लायनर बसवून वॉटर प्रुफिंग, स्मार्ट कार्ड प्रणाली, सीसी टीव्ही व नवीन विजेचे दिवे बसवण्यात येणार आहेत. यासाठी 27 कोटी 35 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये 5 टक्के आकस्मित खर्च, 12 टक्के जीएसटी व 4 टक्के वास्तुविशारदावर करण्यात येणार आहेत. 

यावेळी शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत व विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी वंडर्स पार्कर एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असणाऱ्या खर्चाबद्दल प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी वंडर्स पार्क हा पालिकेसाठी सफेद हत्ती असल्याची उपमा नगसेवक नामदेव भगत यांनी दिली. वास्तुविशारदावर 4 टक्के खर्च का करण्यात येत आहे. पालिकेचे अंभियते स्वतः का करू शकत नाही? असा सवाल विराधी पक्षनेते विजय चौगुले यांनी उपस्थित केला. अखेर या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. 

या साधनांची दुरुस्ती होणार! 
वंडर्स पार्कमधील संगीतमय कारंजे, प्रेक्षागृहाची दुरुस्ती, वॉटर बॉडीला लायनर बसवून वॉटर प्रुफिंग, स्मार्ट कार्ड प्रणाली, सीसी टीव्ही व नवीन विजेचे दिवे बसवण्यात येणार आहेत. यासाठी 27 कोटी 35 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT