daily wagers 
मुंबई

पैसे नाही, रेशन कार्ड नाही, रोजची उपासमार...; मजुरांचा भाकरीसाठी संघर्ष

सकाळवृत्तसेवा

वसई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजूरांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गरीब मजुरांना रोजच भाकरी आणि जगण्यासाठी संघर्षाची लढाई लढावी लागत असल्याचे चित्र वसईत दिसत आहे.

वसईच्या गावराईपाडा, मुंबई अहमदाबाद महामार्ग, पेल्हार, संतोषभुवन, नगीनदासपाडा, वालीव, सातिवली यासह आजूबाजूच्या परिसरात हजारो मजूर राहतात. बांधकाम व्यवसाय, रस्त्यांची कामे, खोदकाम अशी रोजंदारीची कामे करुन हे मजूर राहतात. संचारबंदी सुरु झाल्यानंतर मोलमजुरी करणाऱ्यांचे हाल सुरू झाले आहेत. पैसा नाही, रेशनकार्ड नसल्याने त्याचा लाभ नाही, त्यातच कोणत्या सामाजिक संस्थेने जेवण दिले तर ठीक अन्यथा उपाशी दिवस ढकलावा लागत आहे. यात लहान मुलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. 

तसेच घरात कुणी आजारी पडले तर दवाखाने सुरु नसल्याने उपचार कुठे करायचे ही समस्या देखील त्याना सतावत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. कोरोना कायमचा जावो आणि पुन्हा मजुरीचे काम मिळो या आशेवर येथील हे मजूर जगत आहेत.

येथे सफाई, जंतुनाशक फवारणी होत नाही. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. संचारबंदीचे पालन केले जाते, मात्र उकाडा जास्त असल्याने आम्हाला राहत असलेल्या गाळ्याचे शटर उघडून बसावे लागत आहे. त्यात दोन वेळच जेवणही नशिबात नाही. मुलांची भूक देखिल भागत नाही. 
मंगल दुबे, रहिवासी, वसई.

Workers struggle for one time meal in Vasai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT