Mumbai News Esakal
मुंबई

Mumbai News: वांद्रे-वरळी सी लिंकवरून तरुणाने उडी मारून केली आत्महत्या

वांद्रे-वरळी सी लिंकवरून २७ वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. वांद्रे-वरळी सी लिंकवरून २७ वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आकाश सिंह असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या करारा आकाश सिंह हा परळ येथील रहिवासी होता. माझा मोबईल खाली पडला असा सांगत तो टॅक्सीमधून सी लिंकवर उतरला. त्यानंतर त्याने खाली उडी मारली. मच्छीमार नौकांच्या मदतीने पोलिसींनी आकाश सिंह याचा मृतदेहाचा शोध घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री तो वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सहून परळला जाण्यासाठी टॅक्सीत बसला, पण नंतर त्याने ड्रायव्हरला सी लिंकवर नेण्यास सांगितले, असे वरळी पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

सी लिंकवर असताना, त्याने अचानक त्यांचा मोबाईल फोन खाली पडला आहे, असं सांगून ड्रायव्हरला टॅक्सी थांबवण्यास सांगितले, असे अधिकाऱ्याने सांगितले. ड्रायव्हरने टॅक्सी बाजूला घेतल्यावर तो खाली उतरला आणि त्याने सी लिंकवरून समुद्रात उडी मारली.

त्याचा मृतदेह रात्री उशिरा बाहेर काढण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले. प्राथमिक तपासानुसार, आई-वडिलांसोबत राहणाऱ्या सिंगचे तीन महिन्यांपूर्वी प्रेयसीसोबत ब्रेकअप झाले होते. पोलिस पुढील तपास सुरू आहे.

देशासह राज्यभरात दिवाळी सणाचा उत्साह सुरू असतानाच या तरुणाच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. आकाश सिंह याने नेमकी आत्महत्या का केली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान तरूणाईमध्ये ताण तणाव वाढल्याने देखील आत्महत्येसारखे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : खासदर शोभाताई बच्छाव यांचा पाचोरा तालुक्यातील पाहणी दौरा पूर्ण

Akola News : आरक्षण जाहीर! कुठे धक्का तर कुठे मिळाली संधी; जिल्ह्यातील पाच नगराध्यक्ष पदांवर महिलाराज

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

SCROLL FOR NEXT