योग या शब्दाचा अर्थ आहे ‘मिलन’ किंवा एकरूप होणे; पण आज सर्वसामान्य लोकांची योग म्हणजे योगासने अशी समजूत प्रचलित आहे. योगासने केवळ एक छोटासा पैलू आहे. योगाच्या पूर्वतयारीचा. योग म्हणजे एक सराव नव्हे; एक विशिष्ट कृती किंवा बैठक अथवा आसनही नव्हे, ती तुमच्या असण्याची रीत आहे. एखादी व्यक्ती अस्तित्वातील सर्व काही आपलाच एक अविभाज्य अंग असल्याची अनुभूती करू लागल्यावर आपण म्हणतो, ते योगात आहेत. बौद्धिकदृष्ट्या, योगाबद्दल आपण काहीही म्हणत असू, ते तुमच्यात कुतूहल निर्माण करू शकते किंवा योगमार्गावर वाटचाल करण्यासाठी तुम्हाला प्रेरित करू शकते. पण ‘योग’ काय आहे, हे शब्दांमधून कधीच व्यक्त करता येणार नाही. मात्र, एखादी व्यक्ती उत्सुक आणि राजी असल्यास योग नक्कीच अनुभवता येऊ शकतो.
मुळात ज्याला आपण ‘जीवन’ म्हणतो तोच योग आहे. तुम्ही त्याच्या सान्निध्यात असल्यासच सार्थक जीवन जगू शकता. ज प्रत्येक मनुष्य त्याच्या प्रत्येक कार्यकृतीतून परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे असे घडून यायचे असल्यास योग हाच एकमेव मार्ग आहे. जेव्हा मी ‘योग’ असे म्हणतो, तो काही फक्त एक प्रकारच्या सरावाच्यासंदर्भात असलाच पाहिजे असे नाही. योगाचा आयाम तुम्हाला तुमच्या सर्वोच्च स्वरूपात प्रस्थापित करतो. आयुष्यात तुम्ही अतिशय संवेदनशील स्वरूपाची जागरूकता बाणल्यास तुम्ही करत असलेली प्रत्येक कृती ‘योग’ होऊ शकते. आम्ही शिकवत असलेल्या अभ्यासामुळे तुमची नैसर्गिक श्वसनक्रियाही योग क्रियेत बदलली जाते. तुमच्या शरीरात घडणारी प्रत्येक नैसर्गिक कृती आणि प्रत्येक रासायनिक क्रिया योग होऊ शकते. तुमच्या संकुचित मर्यादा मोडून तुमच्या अनंत स्वरूपात स्थित होण्यासाठी लागणारी साधने किंवा पद्धती तुम्ही वापरत असल्यास काही ना काही मार्गाने तुम्ही त्यांना भेदून जाणार नाही, तोपर्यंत तुम्हाला परिपूर्णता लाभणार नाही.
जागतिक योग दिन : एक ऐतिहासिक घटना
पहिला योगी ः आदियोगीने १५ हजार वर्षांपूर्वी योग विज्ञानाची शिकवण व प्रसार केल्यापासून योगाच्या प्रसारासाठी पुष्कळ काही घडले आहे. अनेक राजे व सत्ताधीशांनी योगमार्गाचा स्वीकार केला आणि सक्रियतेने हे ज्ञान प्रसारित केले. श्रीकृष्णाच्या काळात राजकीय आणि आध्यात्मिक प्रणाली एकत्र गुंफण्याचा कृष्णाचा विचार होता. त्याच्या आयुष्याचा एक मोठा सक्रिय काळ त्याने उत्तर भारतात एक हजारांहूनही अधिक आश्रम स्थापण्यात घालवला, कारण त्याला आध्यात्मिक प्रक्रिया ही एका आश्रमापुरती मर्यादित न राहता संपूर्ण देशभर पसरवण्याची इच्छा होती.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर केला, हे अतिशय विलक्षण आहे. योगाची वैज्ञानिक प्रक्रिया जगभरात मानवी कल्याणासाठी पायाभूत घटना होऊ शकते. म्हणजे तुम्हाला वर-खाली बघण्याची किंवा दैवी मदतीसाठी साकडे घालण्याची गरज नाही, कारण मानवी कल्याण मुख्यतः त्याच्या आतूनच निर्माण होते. तुमचा उद्धार आणि विनाश दोन्हीही केवळ आतूनच केला जाऊ शकतो. जग आता मान्य करू लागलेय की, मानवी कल्याण आपल्या आतच आहे. विश्वासाठी हे एक प्रचंड मोठे पाऊल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.