Ravi Prakash Kakade esakal
नांदेड

Parbhani : आईच्या डोळ्यांदेखत तरुण मुलाचा मृत्यू; आक्रोश पाहून गावकरीही सुन्न

परभणीत एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आलीय.

सकाळ डिजिटल टीम

परभणीत एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आलीय.

Parbhani News : परभणीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सेलू तालुक्यात मन हेलावून टाकणारी ही घटना घडलीय. यामध्ये आईच्या डोळ्यांदेखत तिच्या 22 वर्षीय तरुण मुलाचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. रवी प्रकाश काकडे (Ravi Prakash Kakade) असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव असून या घटनेमुळं मोरेगाव (Moregaon) इथं हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुलाचा पाय घसरून खड्ड्यात पडून मृत्यू

या घटनेनं संपूर्ण गाव हादरलं आहे. तर, मयत तरुणाच्या आईचा आक्रोश पाहून गावकरीही सुन्न झाले आहेत. नवरात्रीचा (Navratri Festival) सण असल्यामुळं आईसोबत कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या 22 वर्षीय मुलाचा पाय घसरून खड्ड्यात पडून मृत्यू झाला. आईच्या डोळ्यांदेखतच ही घटना घडली. परभणीच्या सेलू तालुक्यातील मोरेगाव या गावी ही दुर्दैवी घटना घडलीय.

रवीच्या मृत्यूमुळं हळहळ

रवीच्या मृत्यूमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे. सेलू तालुक्यातील (Selu Taluka) मोरेगावमधील रवी प्रकाश काकडे हा तरुण नवरात्रोत्सव सुरू असल्यानं आपल्या आईसोबत गावा शेजारून होणाऱ्या दुधना नदीपात्रामध्ये (Dudhana River) कपडे धुण्यासाठी गेला होता. अशातच निम्नदुधना प्रकल्प 100 टक्के भरला असल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात सोडण्यात आला होता. त्यामुळं दुधना नदी दुथडी भरून वाहत होती.

आईसोबत कपडे धूत असताना रवीचा अचानक तोल गेला

यादरम्यान, आईसोबत कपडे धूत असताना रवीचा अचानक तोल गेला व तो नदीतील खड्ड्यामध्ये जाऊन पडला. यानंतर कपडे धूत असलेल्या आईनं मुलगा खड्ड्यात पडल्याचं पाहून आरडाओरड केला. यावेळी जमलेल्या ग्रामस्थांनी दुधना नदीपात्रात उतरून रवीचा शोध घेऊन त्याला बाहेर काढलं. यानंतर त्याला तातडीनं उपचारासाठी सेलूतील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रवीला तपासून मृत घोषित केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT