किनवट (जि.नांदेड) : किनवट तालुक्यातील शिवणीपासून आठ किलोमीटरच्या अंतरावरील तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या गोंडजेवली येथील शेतकऱ्यांनी केळीचे पिक घेतले आहे. पण मोठा खर्च करुनही अपेक्षित भाव मिळत नाही. Banana Grower Farmers In Kinwat Tahsil Of Nanded
नांदेड

किनवटच्या केळीला पंजाबमध्ये मागणी, पण शेतकऱ्यांना भुर्दंड

विठ्ठल लिंगपुजे

शिवणी (जि.नांदेड) - किनवट (Kinwat) तालुक्यातील शिवणीपासून आठ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या गोंडजेवली येथील शेतकरी विष्णू नानासाहेब बिराजदार यांनी आपल्या शेतात केळीची लागवड केली आहे. शेती परवडत नाही, असे आपण नेहमीच ऐकतो. शेतमालाचे पडलेले भाव, निसर्गाचा लहरीपणा यामुळे दरवर्षी शेतीची व्यवस्था कोलमडते आहे, असे असतानाही शेतकऱ्यांनी जिद्दीच्या जोरावर शेतात केळीचे पिक घेतले आहे. तसा हा भाग कोरडवाहू (Nanded) आहे. पावसाच्या पाण्यावर बहुतांशी शेतकऱ्यांची शेती आहे. पण शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सिंचनाची सोय करून ऊस, केळी, पपई ही पिके घेत असतात. पण गेल्या वर्षापासून कोरोनाचा काळ असल्याने या दर्जेदार केळीला या भागातील व तेलंगणातील (Banana Grower Farmers) व्यापाऱ्यांकडून भाव मिळत नसल्याने या दर्जेदार केळीला पंजाब व चंडीगड येथून मागणी आहे.

पण तेथील व्यापारी चांगल्या दर्जाची केळी खरेदी करून त्याची छाटणी करून घेत असल्याने शिल्लक राहिलेली केळी शेतकऱ्यांना उकिरड्यावर व जनावरांना टाकण्याची वेळ आली आहे. केळीची लागवड केल्यापासून ते केळी काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. यावर्षी पिकावर व्हायरसचा प्रादूर्भाव झाल्याने या भागातील व्यापारी भाव पाडून मागणी करत आहेत. केळी पिकाला वर्षभर मेहनत करून केळीचे पीक घेतले. पण म्हणावा तसा भाव मिळत नसल्याने केळीचे पीक घेणारा शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT