Nanded News 
नांदेड

मुलीच्या लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या वधू पित्याला मिळाला मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात चौथा लॉकडाउन सुरु झाला आहे. परिणामी, २४ मार्चपासून उद्योधंदे, व्यवसाय बंद असल्याने हाताला काम नाही. त्यामुळे अनेक कामगारांना आर्थिक समस्यांशी झुंज द्यावी लागत आहे. काहींना मदत मिळते तर काहींना मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. संकटाशी सामना करून दिवस काढणे हाच एकमेव पर्याय त्यांच्या समोर आहे.

कासारखेड येथील फोटोग्राफर होनाजी हिंगोले यांच्या उच्चशिक्षित मुलीचे हिवरा (ता. पूर्णा) येथील एका युवकाशी रितीरिवाजानुसार चार महिन्यापूर्वीच लग्न ठरले होते. आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना देखील आपण फोटो शॉपीच्या माध्यमातून पैसा कमावून आपल्या मुलीचे मोठ्या धामधुमीत लग्न करावे अशी वधूपिता आणि माता यांची इच्छा होती.  परंतु देशात कोरोना महामारी आली आणि देशच लॉकडाउन झाला. 

हिंगोले कुटुंबिय होते चिंतेत
परिणामी लॉकडाउनमुळे लग्नकार्यांसह इतरही कार्यक्रम रद्द झाल्याने अनेकांच्या व्यवसायांवर गंडांतर आले. त्यातून छायाचित्रकारांचा व्यवसायही सुटला नाही. सुमारे दोन महिन्यांपासून फोटोग्राफी व्यवसाय ठप्प असल्याने आर्थिक स्त्रोतच बंद झाले आहे. त्यामुळे होनाजी हिंगोले यांच्यासमोर मुलीच्या लग्नाचा मोठा प्रश्‍न उपस्थित झाला. यातून कसा मार्ग काढावा हेच त्यांना सुचेनासे झाले. कारण शेत जमीन, उत्पन्नाचे अन्य कुठलेही साधन नाही. अशातच आपल्या मुलीच्या लग्नाची नियोजित तारीख जवळ आल्यामुळे हिंगोले कुटुंब अतिशय चिंतेत होतं. आजूबाजूच्या पाहुण्यांना त्यांनी मदत मागितली पण अपेक्षित मदत काही मिळू शकली नाही.

वधुपित्याच्या डोळ्यात कतृज्ञतेचे भाव
मात्र, ही बाब तक्षशिला बुद्ध विहार समिती स्वप्नजा गार्डन येथील उपाध्यक्ष श्रीरंग वाघमारे यांना समजली. त्यांनी  या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सदरील बाब सांगितली असता बहुतांश लोकांनी आपापल्या परीने श्री. हिंगोले यांना रोख ११ हजार रुपयांची मदत दिली. वैयक्तिक प्रपंच चालवता चालवता आपण एका गरीब मुलीच्या लग्नासाठी मदत करू शकलो, या भावनेने देणगी दाते आनंदून तर गेलेच; शिवाय अनपेक्षितपणे अकरा हजार रुपयांची मदत मिळाल्यामुळे वधु पित्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव दिसून आले.

यांचे मिळाले सहकार्य
याकामी श्याम कवडे, मधुकर गच्चे, चंद्रकांत घोडगे, अशोक पंडित, भारत वाठोरे, करुणाताई कवडे, प्रमोद मून, विश्वनाथ सुगंधे, डॉ. राजेश पतंगे, संग्राम कांबळे, मनोहर गायकवाड, अशोक हटकर, धम्मचारी पद्मगर्भ, दीपक हनुमंते, जगनराव गोणारकर, कैलास पोहरे, मारुती कदम, सावळीराम मगरे, रमेश वाठोरे, डॉ. राजपाल कोल्हे, दिलीप  मिसाळे, छाया भालेराव, गंगाधर खाडे, बालाजी कोकरे, गोविंद कांबळे, मधुकर नवसागरे, मधुकर सोनकांबळे यांचे सहकार्य मिळाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी

Rajat Patidar: रजत पाटीदारचा धमाका! ख्रिस गेलचा ९ वर्षांचा महाविक्रम धुळीला

काहींना ते झोंबलं कारण ... प्राजक्ता माळीच्या 'कान्स' मधील लूकवर सई ताम्हणकर नेमकं काय म्हणाली? तुम्ही गेलात काय आणि नाही गेलात काय...

Adhik Maas Do's & Don'ts: अधिक मास 2026 सुरू; भगवान विष्णूंची कृपा हवी असेल तर या महिन्यात ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका

माय तशी लेक ! कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याची आराध्यासोबत हजेरी; ग्लॅमरस लूकने जिंकलं मन

SCROLL FOR NEXT