हरनाळा ता. नायगाव गांजाची शेती
हरनाळा ता. नायगाव गांजाची शेती 
नांदेड

वांग्याच्या शेतात गांजाची लागवड; तीन लाखाचे झाडे जप्त- स्थागुशाची कारवाई

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : राहेर येथील शेतकऱ्यांने हरनाळा शिवारातील वांग्याच्या शेतीत गांजाची लागवड केली असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. २२) कारवाई करत गांज्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला ताब्यात घेत ६२ किलो वजनाच्या तीन लाखाच्या गांज्याची झाडे जप्त केली आहेत. सदर प्रकरणी कुंटुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिस उपनिरिक्षक सचिन सोनवणे यांनी दिली आहे.

नायगाव तालुक्यातील राहेर येथील शेतकरी बळीराम गंगाराम घोरपडे यांचे बिलोली तालुक्यातील हरनाळा येथे शेती आहे. कुंटुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हरनाळा परिसरात असलेल्या गट नंबर ३६ मधील शेतात वांग्याचे पिक घेतले. पण या वांग्याच्या पिकात गांज्याच्या झाडाची लागवड केली. सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सचिन सोनवणे यांच्या पथकाने (ता. २२) रोजी सकाळी हरनाळा शिवारातील शेतात धाड मारली. यावेळी वांग्याच्या पिकात कुठलीही परवानगी न घेता गांज्याची ३८ झाडे लावल्याचे दिसून आले.

हेही वाचा - मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. मुगाजी बुरुड व राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले यांनी केले.

यावेळी गांज्याच्या झाडांची लागवड करणारे बळीराम घोरपडे यांना अगोदर ताब्यात घेतले व बिलोलीचे पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे व नायब तहसीलदार ओमप्रकाश गौंड यांच्या उपस्थितीत पंचनामा करुन तीन लाख रुपये किमतीचे ६२ किलो वजनाची ३८ गांज्याची झाडे जप्त करण्यात आली. घोरपडे हा गांजाची नशा करणारा शेतकरी असून तो शेतातच गांजाचे उत्पादन घेतो आणि ही बाब कुंटुर पोलिसांसह परिसरातील अनेकांना माहित आहे पण आजपर्यंत कुणीही कारवाई केली नसल्याची माहिती मिळाली.

येथे क्लिक करा - सोलापूरच्या महिलेला नांदेडचे लग्न पडले पावणेदोन लाखाला; वाचून व्हाल थक्क

सदर प्रकरणी कुंटुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार दशरथ जांभळीकर, मारोती करले, तेंलग, रणधीर राजवंशी, मोतीराम पवार, विठ्ठल शेळके, देविदास चव्हाण आदींचा सहभाग असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक सोनवणे यांनी दिली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT