नांदेड - जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली.  
नांदेड

लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी - डॉ. दीपक म्हैसेकर

अभय कुळकजाईकर

नांदेड - जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असून याबाबत लोकांनी अधिक जागरुकता बाळगून तपासणीसाठी विश्वासाने पुढे सरसावणे आवश्यक आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही चिंतेची बाब असून आरोग्य विभागानेही कोरोना तपासणीचा वेग अधिकाधिक कसा वाढेल, याबाबत योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी मंगळवारी (ता. १६) दिले. 

नांदेड जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव, आरोग्य विभागाची यंत्रणा आणि प्रशासनातर्फे केले जाणारे नियोजन याची आढावा बैठक मंगळवारी  जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, महापालिका उपायुक्त अजितपालसिंघ संधू, आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार कापसे, डॉ. संजय मोरे, डॉ. शीतल राठोड, डॉ. सचिन तोटावार, डॉ. गाडेकर, डॉ. शंकर अन्नपुर यांची उपस्थिती होती.

लसीकरण माहिमेला अधिक गती द्यावी
नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींचा मृत्यूचा दर हा ३.०८ टक्के इतका झाला आहे. सद्य स्थितीत दर दिवशी पाचशे तपासण्या होत आहेत. हा तपासणी दर वाढवून दोन हजार आठशे तपासण्या झाल्या पाहिजेत, असेही मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले. राज्य शासनातर्फे वेळोवेळी कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जे निर्देश दिले जात आहेत त्या निर्देशांचे पालन झाले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. म्हैसेकर यांनी व्यक्त करून कोरोना लसीकरण माहिमेला अधिक गती देण्याबाबतही सांगितले.

व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी
लसीकरण मोहिमेच्या पहिल्या फेरीत आरोग्य क्षेत्रात काम करणारे व कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कार्यरत असलेल्या फ्रंट लाईन वर्कर यांच्यासाठी असलेली लसीकरणाची मोहिम अधिक गतीने वाढविण्याबाबत स्पष्ट सुचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यात होणारे सांस्कृतिक, वैयक्तिक समारंभ येथे अमाप गर्दी जमा होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव अचानकपणे वाढविण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे मार्गदर्शक सुचनाप्रमाणे नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थींना सोशल डिस्टन्सींग, मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करण्याबाबत व्यापक प्रमाणावर जनजागृती, याबाबत प्राथमिक स्वरूपाची माहिती व छायाचित्र लावण्यात यावीत असे डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.  

इतर आजारावर देखील लक्ष देणे गरजेचे 
कोविड-१९ व्यतिरिक्त इतर आजारावर देखील लक्ष देणे गरजेचे आहे. क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याचे काम हे ६० टक्के झाले आहे. हे काम अत्यल्प आहे, हे काम वाढविण्यात यावे, अशा सुचना जिल्हा आरोग्य विभागास डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या. मोतीबिंदू, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आणि लसीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावेत. जिल्ह्यातील गठीत कोविड-१९ टास्क फोर्सच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून जिल्ह्यातील संभाव्य वाढीव कोविड प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वेळोवेळी उपाययोजना करण्याबाबत सुचना देण्यात दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay: थलापती विजयच्या दारात सत्तेची ‘ऑफर’! भाजप म्हणते उपमुख्यमंत्री व्हा, पण विजयची नजर थेट मुख्यमंत्रिपदावर?

फक्त 50 हजार रुपयांत स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; खरेदीसाठी लागल्या रांगा, पाहा सर्व डिटेल्स एका क्लिकवर

Summer Health Tips: उन्हाळा आला…आरोग्याची काळजी घ्या! तब्येत सांभाळण्यासाठी काय खावं, काय टाळावं ते जाणून घ्या

Latest Marathi Live Update : नाशिकमध्ये परप्रांतीय ठेकेदाराकडून सुपरवायझरला बेदम मारहाण

LPG Gas Shortage: वडापाव चाळिशीपार, चहा तिशीला! चाकण औद्योगिक वसाहतीतील स्थिती; भजी खाणेही आवाक्याबाहेर

SCROLL FOR NEXT