नांदेड - अवैध वाळू उत्खनानाबद्दल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. 
नांदेड

वाळूचा अवैध साठा केल्यास जागा मालकांवरही होणार गुन्हे दाखल - जिल्हाधिकारी डॉ. विपीन

अभय कुळकजाईकर

नांदेड - शहर आणि जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाला आळा बसावा, यासाठी आता जिल्हा प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलली असून नांदेड महापालिका, जिल्ह्यातील नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या हद्दीत जिथे कुठे मोठ्या प्रमाणावर वाळूसाठा उपलब्ध असेल त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंचनामा करून संबंधित जागा मालकांवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. 

नांदेड जिल्ह्यातील गोदावरी पात्र व इतर नदी क्षेत्रातील अवैधरित्या होणाऱ्या वाळू उत्खननाला आळा बसण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे तराफे उध्वस्त करण्यासमवेत रेतीचे वाहने जप्त केली जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. स्वतः जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी महसूल, पोलिस, आरटीओ आदी विभागाला सोबत घेत जिल्ह्यातील विविध भागात कारवाया केल्या आहेत. 

जिल्हा प्रशासनाने उचलली कठोर पावले
अवैध वाळू उत्खननाला आळा बसावा, यासाठी आता आम्ही अधिक कठोर पावले उचलत असून नांदेड महानगरपालिका, जिल्ह्यातील नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या हद्दीत जिथे कुठे मोठ्या प्रमाणावर वाळूसाठा उपलब्ध असेल तो जिल्हा प्रशासनातर्फे जागच्या जागीच जप्त करुन ज्याच्या मालकीची ती जागा किंवा प्लॉट आहे त्या प्लॉटधारकाविरुध्द गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सोमवारी (ता. एक) दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी अवैध वाळू उत्खनानाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापक बैठक झाली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार किरण अंबेकर उपस्थित होते. सर्व विभागाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सहभाग घेतला.

जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन
वाळूचे गगनाला भिडलेले भाव लक्षात घेता ज्या नागरिकांनी बांधकासाठी वाळू घेवून ठेवलेली आहे. त्यांनी वाळूच्या पावत्या तपासणी पथकाला दाखवाव्यात. वाळूच्या पावत्या देणे हे कायद्याने बंधनकारक असून अवैध वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी महसुलच्या पथकांना जनतेने सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू; २० प्रभागांसाठी ५८४ मतदान केंद्रांची अधिकृत घोषणा

नवऱ्याला ८० हजार पगार, तरीही हुंड्यात मागतोय म्हैस; पत्नी तीन वर्षांपासून माहेरी, पोलिसांत जात नवऱ्याचे काळे कारनामे केले उघड

Viral Video : शिक्षक की हैवान? दिव्यांग मुलाला पाइपने बेदम मारहाण, डोळ्यात फेकली मिरची पावडर; व्हिडिओ पाहून रक्त खवळल्याशिवाय राहणार नाही

Shubman Gill: शुभमन गिलची संघात झाली निवड; अर्शदीप सिंग, अभिषेक शर्मा यांच्यासोबत खेळताना दिसणार; न्यूझीलंडविरुद्ध...

Heart Attack Risks: तुमच्या आरोग्याशी संबंधित 'हे' ४ घटक ठरतायत हृदयाचे शत्रू; ९९% भारतीयांना हार्ट अटॅकचा धोका! आजच तपासा

SCROLL FOR NEXT