file photo
file photo 
नांदेड

सावधान : दोन महिण्यानंतर पिरबुऱ्हाननगरमध्ये कोरोनाचा शिरकाव

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाने आपले पाय चांगलेच रोवले असल्याचे दररोज येणाऱ्या अहवालावरुन स्पष्ट होत आहे. प्रशासनाकडून या आजाराचा प्रादूर्भाव होउ नये म्हणून काळजी घेण्यात येत असतांना नव्या वसाहतीत नव्याने रुग्ण आढळत असल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण आढळलेल्या पिरबुऱ्हाननगरमध्ये पुन्हा तब्बल दोन महिण्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. मात्र त्या रुग्णाचा मृत्यूनंतर घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालात कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे  रुग्णालय सुत्रांनी सांगितले. या घटनेमुळे पुन्हा एकदा पिरबुऱ्हाननगर भागात खळबळ उडाली आहे. 

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संबंध देशभर व राज्यात लॉकडाउन सुरू आहे. त्याचाच क भाग म्हणून नांदेड जिल्हाही सध्या ता. ३० जूनपर्यंत लॉकडाउनमध्ये आहे. जिल्ह्यात ग्रामिण भागात कोरोनाचा फैलाव झाला आहे. मुखेड तालुक्यात याचा सर्वाधीक फटका बसला आहे. तसेच नांदेड शहराच्या सर्वच दिशांनी कोरोनाने आपला मोर्चा वळवला आहे. नव्या वसाहतीत रुग्ण आढळत असल्याने तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नांदेड जिल्ह्यात आता मृत्तकांची संख्या ही १४ वर जावून पोहचली आहे.

हेही वाचा  Video - भाजपने केला कपटी चिनी ड्रॅगनचा निषेध
 
जिल्ह्यातील पहिला रुग्ण याच परिसरात आढळला होता

शहराच्या पिरबुऱ्हाननगर भागात ता. २२ मार्च रोजी एक ६४ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधीत आढळली होती. त्या रुग्णावर शासकिय रुग्णालय विष्णुपूरी येथे उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे पहिल्या अहवालानंतर त्याचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हा परिसर कन्टेनमेन्ट झोन जाहीर करण्यात आला होता. रमजान इदच्या समोर या भागातील कन्टेनमेन्ट झोन काढण्यात आले होते. कुठे तरी आता या भागातील व्यवहार शासनाच्या नियमानुसार सुरू झाले होते. मात्र पुन्हा आता हा परिसर कन्टेनमेन्ट झोनच्या दिशेने गेला आहे. 

पिरबुऱ्हाननगरला दोन महिण्यानंतर कोरोनाचा धक्का 

पिरबुऱ्हाननगर भागातील एका ६२ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा गुरूवारी (ता. १८) मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. शनिवारी (ता. २०) सकाळी त्याच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तब्बल दोन महिण्यानंतर या परिसरात पुन्हा कोरोनाचा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णांच्या मृत्यूनंतर त्याच्या घरच्या लोकांचे व परिसरातील नागरिकांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. तसेच हा भाग पुन्हा कन्टेनमेन्ट झोन करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्याचे दिसुन येते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

Elvish Yadav : रेव्ह पार्टीनंतर एल्वीश पुन्हा अडचणीत ; मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT