कॅनाॅलमध्ये पडलेली कार बाहेर काढताना
कॅनाॅलमध्ये पडलेली कार बाहेर काढताना 
नांदेड

कॅनालमध्ये पडलेल्या कारमध्ये अडकलेल्या आईसह चिमुकल्यांना जीवदान; विठ्ठलाच्या धाडसाला सलाम

प्रताप देशमुख

बारड ( जिल्हा नांदेड ) : बारड (तालुका मुदखेड) येथील युवकांनी (Barad canol) जीवाची पर्वा न करता कॅनलमध्ये कारसह बुडणाऱ्या आई व चिमुकल्या दोन मुलांना सुखरुप बाहेर काढून जीवदान दिले. बारडच्या विठ्ठल गोडसे (Vitthal Godse) यांच्या धाडसाला गावकऱ्यांनी मात्र सलाम केला आहे. महामार्ग पोलिसांच्या (Highway Police) तत्परतेने प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून मन हेलावून टाकणारी घटना आहे. (Childrens -with- his- mother- trapped -in -a- car- lying- in -the -canal- Salute- to- the -courage- of- Vitthal)

बारड भोकर महामार्गामधून जाणारा मोठा कॅनल सध्या उर्ध्व पैनगंगेच्या पाण्याने दुथडी भरुन वाहत आहे. हसापुर (ता. भोकर) येथील दत्ता कोंडिबा जाधव आपल्या पत्नी व दोन चिमुकल्यांसह (MH 26 AS 4999) स्वतः च्या कारने गावाकडे जात होते. बारडपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्यावरुन जात असताना कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला असल्याची चाहूल लागताच काही क्षणातच दत्ता जाधव यांनी सावधानता दाखवत उडी मारली. परंतु पत्नी व दोन चिमुकल्यांसह कार कालव्याच्या वाहत्या पाण्यात पडली. यानंतर दत्ता जाधव यांनी पत्नीवर चिमुकल्यांना वाचवण्यासाठी कोणाची तरी सहकार्य मिळावे या केविलवाणे या अपेक्षेने आरडाओरडा केली.

हेही वाचा - वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू?

केविलवाणी हाक कानी पडताच काही क्षणातच विठ्ठल गोडसे व अमोल चौधरी हे दोघे युवक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अमोल चौधरी यांनी काही क्षणाच्या अंतरावरुनच दोरी आणली. विठ्ठल गोडसे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दोरीच्या आधार घेत कालव्यात उडी मारली. वेळेची सावधानता बाळगून कालव्याच्या वाहत्या पाण्यात वाहत असलेल्या बंद कारमधील मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुक्‍मीनबाई कोंडीबा जाधव, प्रगती कोंडिबा जाधव, विकास कोंडीबा जाधव या तिघांना शिताफीने बाहेर काढले. या घटनेत घाबरलेल्या कुटुंबियांना दवाखान्यात हलवण्याची जबाबदारी असलेल्या जनतेचे रक्षक समजल्या जाणाऱ्या महामार्ग पोलिस उपनिरीक्षक योगेश भद्रे, श्रीनिवास चंन्ना जेलू, शेख गन्नी, शेवाळकर परमेश्वर श्रीमंगले, अमोल सातारे, प्रकाश गणेशराव देशमुख यांनी तत्परता दाखवत प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

हल्ली सत्ता व्यवस्थेने माणुसकीचे वळण बदलले असले तरी आपल्या पूर्वजांनी देशात असो वा राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात किंवा गावात एकमेकांना सहाय्य करु अवघे धरु सुपंथ अशा काही प्रथा परंपरा निर्माण केली आहे. त्याचा एवढ्या लवकर विसर आजच्या युगातल्या युवकांना निश्चितच पडणार नाही असं या घटनेवरुन तरी लक्षात येते. बारडच्या युवकांनी कोरोनासारख्या भयावह परिस्थितीमध्ये माणुसकीचे भान ठेवत आईसह दोन चिमुकल्यांना जीवदान दिल्याने गावकऱ्यांनी युवकांच्या धाडसाला सलाम केला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

2024 च्या वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-२० मधून घेणार निवृत्ती- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT