File Photo 
नांदेड

प्रसूती वार्डातून पळालेल्या महिलेची प्रकृती गंभीर

शिवचरण वावळे

नांदेड - विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेली एका २४ वर्षीय गर्भवती महिलेस तपासणीसाठी वार्डात घेऊन जात असताना ती रुग्णालयातून पळुन जाण्याच्या प्रयत्नात पायऱ्या उतरत असताना पाय घसरुन पडल्याने गंभीररित्या जखमी झाली. त्या महिलेची प्रकृती गंभीर असल्याची शनिवारी (ता.दोन) घटना घडली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील रेणापूर येथील रिंकु रोहित चौरंगे (वय २४) ही नऊ महिण्याच्या गर्भवती आहे. मागील दीड महिण्यापासून या महिलेची मानसिक स्थिती बरी नसल्याने तिच्यावर तिच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरु होते. दरम्यान, प्रसूतीची तारीख जवळ आल्याने या महिलेस वसमत येथून नांदेडच्या डॉ. शकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. 

महिलेस पकडण्यासाठी नर्स- डॉक्टर धावले पण..

शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास तिला प्रसूती विभागात तपासणीसाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर तिची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांच्या समोर ती मनोरुग्ण गर्बवती महिला पळुन जात होती. अच्यानक महिला वार्डाच्या बाहेर निघाल्याने तेथील सुरक्षा रक्षक यांनी महिलेस अडवण्याचा प्रयत्न केला, त्या पाठोपाठ त्या महिलेस पकडण्यासाठी नर्स आणि डॉक्टरांनी तिला आडवण्याचा प्रयत्न केला.

गर्भवती महिलेची चब्येत चिंताजणक

मात्र ही महिला अधिक वेगाने पायऱ्या उतरत होती. वेगाने पायऱ्या उतरण्याच्या नादात तिचा पाय घसरुन पडली. पडल्यानंतर देखील ती महिला उठुन पुन्हा पळण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तिचा तोल जाऊन ती जोराने खाली कोसळली आणि तिच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाली. महिलेच्या डोक्याला व पोटाला गंभीर मार लागल्याने गर्भवती महिलेची चब्येत चिंताजणक आहे.

बाळाचे ठोके लागत नाहीत
प्रसूती विभागात टेबलावर घेत असताना नऊ महिण्याची गर्भवती अचानक पळुन जाण्याच्या प्रयत्नात पायऱ्या उतरत होती. तिला थांबवण्यासाठी सेक्युरिटी गार्ड, नर्स आणि कर्तव्यावर असणारे डॉक्टर तिच्या मागे धावत होते. परंतु, महिला थांबली नाही. वेगाने पायऱ्या उतरताना तिचा पाय घसरला आणि ती पडली. पुन्हा उठुन पळत असताना पुन्हा पडल्याने तिच्या डोक्याला, पोटाला मार लागला. पोटातील बाळाचे ठोके लागत नाहीत. तिची प्रकृती चिंताजणक असल्याने तिला अपघात विभागात दाखल करण्यात आले.

-डॉ. एस.आर. वाकोडीकर, प्रमुख, प्रसूती विभाग. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT