नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ
नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ 
नांदेड

नांदेड महापालिकेच्या सभेत हद्दवाढीवरुन गोंधळ; भाजपचा विरोध

अभय कुळकजाईकर

नांदेड ः नांदेड वाघाळा महापालिकेची आॅफलाइन सभा तब्बल वर्षभरानंतर बुधवारी (ता. २३) झाली. या सभेत महापालिकेच्या हद्दवाढीच्या प्रश्नावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ झाला. त्यातच सत्ताधारी कॉँग्रेसने प्रस्ताव मंजूर केला तर भाजपने त्यास विरोध केला. त्याचबरोबर सातवा वेतन आयोग, पावसाळ्यापूर्वीची स्वच्छता तसेच पाणी टंचाई आणि पाणी पुरवठ्यावरुनही सर्वच पक्षाचे पदाधिकारी, सदस्य संतप्त आणि आक्रमक झाले होते.

महापालिकेची सकाळी अकरा वाजता सुरु झालेली सभा दुपारी तीन वाजता संपली. महापौर मोहिनी विजय येवनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपमहापौर मसूद खान, सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, नगरसचिव अजितपालसिंघ संधू यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, सदस्य, अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा - देशाच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-२’ या अवकाश मोहिमेचे निष्कर्ष संशोधकांच्या हाती लागले आहेत.

पाणी पुरवठ्यावरुन सदस्य आक्रमक

विष्णुपुरीचा प्रकल्प भरलेला असूनही पाच दिवसानंतर काही भागाला पाणीपुरवठा होत असल्याबद्दल सर्वच पक्षाचे सदस्य संतप्त आणि आक्रमक झाले होते. बजेट नसल्याचे कारण सांगून पाणीपुरवठा विभागाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई आणि स्वच्छतेवरही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. नगरसेवक बालाजी जाधव यांनी विष्णुपुरी प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडत असताना १८ व्या क्रमांकाचा दरवाजा उघडावा, अशी मागणी केली जेणेकरुन पंपगृहाजवळील गाळ वाहून जाईल आणि चांगल्या पद्धतीने पाणीपुरवठा करता येईल, अशी मागणी केली. याबाबत आयुक्त डॉ. लहाने यांनी जलसंपदा विभागाशी चर्चा करण्याचे तसेच नालेसफाई आणि स्वच्छतेबाबतही नगरसेवकांसोबत चर्चा करण्याचे मान्य केले. तसेच पाणीपुरवठ्याबाबत कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी माहिती दिली.

येथे क्लिक करा - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात डिजीटल सात-बारा उतारा मोहीम सुरू झाली. दुसऱ्यांदा महसूलमंत्री झाल्यानंतर त्याला मूर्त स्वरूप आले.

सातव्या वेतन आयोगावर चर्चा

शहरात मोकाट कुत्रे, डुकरांचा सुळसुळाट झाल्याने त्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारीही यावेळी काही सदस्यांनी केल्या. महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी विरोधी पक्षनेते रावत, नगरसेवक मुन्तजीब यांच्यासह काही सदस्यांनी केली. लिपिक आणि वरिष्ठ लिपिक यांच्या पदोन्नती आणि वेतनश्रेणीबाबतही लवकर निर्णय घेऊन त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन आयुक्त डॉ. लहाने यांनी सांगितले. हद्दवाढीच्या प्रस्तावावर सभागृह नेते गाडीवाले आणि विरोधी पक्षनेते रावत यांच्यात जुगलबंदी रंगली. भाजपने विरोध केला तर दुसरीकडे कॉँग्रेसने हद्दवाढ का गरजेची आहे, हे सांगत ठराव मंजूर करुन घेतला.

अशोक चव्हाण, सावंत यांचे अभिनंदन

राज्‍याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री यांनी समृद्धी महामार्ग आणि बुलेट ट्रेन संदर्भात नांदेड जोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. त्याचबरोबर शिर्डी संस्थानवर माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांची नियुक्ती केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

हे उघडून तर पहा - उपोषणकर्त्यांची पोलिसांना मारहाण; उमरी येथील घटना

अनेकांचे झाले सव्वा वर्षांनी दर्शन

दरम्यान, कोरोना संसर्गामुळे अनेक नगरसेवकांचे तब्बल सव्वा वर्षांनी दर्शन झाले. कोरोना संसर्गात अनेकांनी आपआपला व्यवसाय, उद्योग सांभाळत महापालिकेत येण्याचे जवळपास टाळले होते. असे काही सदस्यांचेही आजच्या सभेत दर्शन झाले. काहीजण यापूर्वी आॅनलाइन सहभागी झाले होते. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने महापालिकेतही बऱ्यापैकी गर्दी दिसू लागली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT