file photo 
नांदेड

नांदेड : केंद्राच्या कृषी विधेयकांविरोधात काँग्रेसचा गुरुवारी एल्गार

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शेतकर्यांची फसवणूक करणार्या केंद्राच्या कृषी विषयक कायद्याच्या विरोधात काँग्रेसने यल्गार  पुकारला असून गुरूवार (ता. 15) ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे होणार्या सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

या सभेच्या थेट प्रेक्षपणासाठी नांदेड येथे भव्य व्हर्च्युअल सभेचे  आयोजन करण्यात आले असून 20 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण जिल्ह्यातून शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ सुमारे दिड लाख नागरिकांच्या सह्यांचे निवेदन महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे विधान परिषदेचे प्रतोद व महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांनी आज येथे दिली.

सकाळी 10 वाजता एका व्हर्च्युअल सभेचे आयोजन

केंद्र सरकारने देशातील शेतकर्यांना देशोधडीला लावणार्या तीन कृषी विधेयकांना मंजुरी दिली आहे. यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून सावकारशाही वाढणार आहे. या विरोधात राज्याच्या वेगवेगळ्या भागात अनेक आंदोलने सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून 15 ऑक्टोबर रोजी संगमनेर येथे काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये यल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
संगमनेर येथील या सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून नांदेड येथील भक्ती लॉन्स मध्ये गुरुवार (ता.15) ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता एका व्हर्च्युअल सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील सुमारे दिड लाख नागरिकांच्या  20 ऑक्टोबर पर्यंत सह्या घेण्यात येणार आहेत. या सह्यांचे निवेदन महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना देण्यात येणार आहे.

आाढावा बैठकीत यांची होती उपस्थिती 

या संदर्भात जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आ.अमरनाथ राजुरकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर मसुद खान, जि. प. चे माजी अध्यक्ष दिलीप पा.बेटमोगरेकर, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, डिपीडीसीचे सदस्य एकनाथ मोरे, सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले, प्रवक्ते संतोष पांडागळे, तालुकाध्यक्ष अ‍ॅड.निलेश पावडे, बालाजी गव्हाणे, जगदिश पाटील भोसीकर, उध्दवराव पवार, बालाजी पांडागळे, अ‍ॅड. प्रितम देशमुख, शिवाजी पा. पाचपिंपळीकर, लिंगुराम कवळे, आनंद भंडारे, विकास देवसरकर, संजय राठोड,  दत्ताहरी पा.चोळाखेकर, किनवटचे माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार, माजी जि.प. सदस्य श्रीनिवास मोरे, बिलोलीचे संतोष कुलकर्णी, मजुर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोणे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पा. कोंडेकर, शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, नगरसेवक संदिप सोनकांबळे, अब्दुल गफार, सत्यजीत भोसले, बाबासाहेब बाबर आदिंची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT