file photo 
नांदेड

नांदेडकरांना दिलासा - ५२ अहवाल आले निगेटिव्ह

अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोना विषाणु संदर्भात घेण्यात आलेल्या व्यक्तींचे स्वँब एक हजार ३५४ असून यापैकी एक हजार २३९ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह असून ५७ स्वॅबचा अहवाल प्रलंबित आहेत. एकूण पाच स्वँब तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला आहे. यापैकी ३४ रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह आहे तर औषधोपचारास प्रतिसाद दिला नसल्यामुळे तीन रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

नांदेडकरांसाठी मंगळवारचा (ता. पाच) दिवस दिलासा देणार ठरला. आज प्राप्त झालेले सर्व ५२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर कोटा येथून आलेल्या विद्यार्थ्यांसह एक हजार २३८ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच ५७ व्यक्तींच्या अहवाल प्रलंबित आहे. 

उर्वरीत अहवाल प्रलंबित 
राज्यस्थान कोटा येथून नांदेड येथे आलेल्या ३४ विद्यार्थ्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला असता त्या सर्व २४ विद्यार्थ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथून नऊ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जे की, अशा व्यक्तींच्या संपर्कात आले होते ज्याचा अहवाल हा पंजाब राज्यात पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.
नांदेड रहेमतनगर येथील मृत्यू महिलेच्या संपर्कात आलेल्या खासगी रुग्णालयातील ४० कर्मचाऱ्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असून प्राप्त अहवालानुसार १९ जणांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला असून उर्वरीत अहवाल प्रलंबित आहेत.

बाधित असलेल्यांवर उपचार सुरु
बाधित असलेल्यांवर विष्णुपुरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी केले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत माहिती
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाबाबत मंगळवारी (ता. पाच) सायंकाळी पाच वाजेपर्यंतची माहिती पुढील प्रमाणे आहे. आत्तापर्यंत एकूण संशयित एक हजार ५३० आहे. क्वारंटाईन व्यक्तींची संख्या एक हजार ४०२ असून क्वारंटाईन कालावधी पूर्ण ४०३, अजून निरीक्षणाखाली असलेले १२५ त्यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये १८२, घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले एक हजार २२० तर आज तपासणीसाठी नमुने घेतले २५, एकुण नमुने तपासणी एक हजार ३५४, एकुण पॉझिटीव्ह रुग्ण ३४ त्यापैकी निगेटीव्ह एक हजार २३८ आहेत. नमुने तपासणी अहवाल बाकी ५७, नाकारण्यात आलेले नमुने पाच, अनिर्णित अहवाल १९ तर कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या तीन असून नांदेड जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी ८९ हजार ९०१ असून या व्यक्तींना घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Green Card Rules Changes : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा भारतीयांना मोठा धक्का; ग्रीन कार्डसाठीचे नियम बदलले, आता मायदेशी परतावं लागणार...

Beed Encroachment: कचऱ्यात फेकली आजीची भाजी; अतिक्रमणविरोधी कारवाई, बीडमध्ये भाजीविक्रेत्या वृद्धेला अश्रू अनावर..

Marathi Live News update: भोंदूगिरीच्या आड काळ्या पैशांचा खेळ उघड, अशोक खरात प्रकरणात कोट्यवधींची जप्ती

Satara Rain: सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; वाई-जावळी परिसरातही मुसळधार पाऊस, वाहनधारकांची तारांबळ, रस्ते जलमय..

IAS अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षण का द्यावे? सर्वोच्च न्यायालयाच्या वक्तव्याने चर्चा; OBC, SC-ST आणि EWS आरक्षणाचे नियम काय?

SCROLL FOR NEXT