perni.jpg
perni.jpg 
नांदेड

सलग पावसाने शेतकरी सुखावला

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात मागील दोन दिवसाच्या पावसानंतर पुन्हा गुरुवारी (ता. ११) सर्वच तालुक्यांत पाऊस झाला. या पावसामुळे पेरणीच्या प्रतिक्षेत असलेले शेतकरी सुखावले आहेत. काही भागात हळद, कपाशीच्या लागवडीसह पेरणीला सूरवात केल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी (ता. १२) सकाळी साडेआठपर्यंत जिल्ह्यात एकूण २३७६.५१ मिलिमीटर, तर सरासरी २३.५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
 
तेरा तालुक्यात पावसाचा जोर
जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून सलग पाऊस पडत आहे. मृग नक्षत्र निघाल्यानंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. यानंतर सलग दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पावसाचे आगमण झाले. हा पाऊस अर्धापूर, किनवट व हदगाव तालुका वगळता इतर १३ तालुक्यात चांगला झाला. 

हळद व कपाशी लागवड सुरु
सलग पावसामुळे जिल्ह्यातील हळद घेणाऱ्या शेतकऱ्यांनी हळदीची लागवड सूरु केली आहे. यासोबत कपाशी व काही ठिकाणी सोयाबीनची पेरणी शेतकरी करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सलग पावसामुळे सुखावलेले शेतकरी पेरणीच्या कामात गुंतल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत एकूण ३७६.५१ मिलिमीटर, तर सरासरी २३.५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

हेही वाचलेच पाहिजे....पेरणीसाठी बळीराजा झाला सज्ज

तालुकानिहाय झालेला पाऊस
(मिलिमीटरमध्ये)
नांदेड १२.३८, मुदखेड १८.६७, अर्धापूर ५.३३, भोकर ३१.५०, उमरी ३२, कंधार २०.६७, लोहा १३.६७, किनवट ८.८६, माहूर १९, हदगाव ५.२९, हिमायतनगर ३०, देगलूर २९, बिलोली ३३.८०, धर्माबाद ३८, नायगाव ३९.२०, मुखेड ३५.१४. जिल्ह्यात एकूण ३७५.५१, तर सरासरी २३.५३ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १३५.५६ मिलिमीटरनुसार ८.०२ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

मंडळनिहाय झालेला पाऊस
(मिलिमीटरमध्ये)
नांदेड शहर १३, तुप्पा ४३, विष्णुपुरी १३, वसरणी २२, लिंबगाव १४, उमरी ५५, सिंधी २२, गोळेगाव १९, मुदखेड २६, मुगट १६, बारड १४, मुखेड ३२, जांब ३०, बाऱ्हाळी ४८, जाहूर १८, चांडोळा २९, मुक्रमाबाद ३९, कुरुळा २०, उस्माननगर १६, पेठवडज १७, फुलवळ २०, बारुळ ४९, माहूर २५, वानोळा १८, वाइ २५, हिमायतनगर ३८, सरसम २७, जवळगाव २५, नायगाव ६१, नसरी ६०, माजंरम २१, बरबडा २०, कुंटूर ३४, माळाकोळी १६, कलंबर २३, सोनखेड १७, कापसी १३, धर्माबाद ४५, जारीकोट ३६, करखेली ३३, आष्टी १२, इस्लापूर २५, जलधारा२१, भोकर २७, किनी २१, मोघाळी ४३, मातूळ ३५, देगलूर १२, खानापूर ३२, शहापूर २३, मरखेल १२, हाणेगाव १७, माळेगाव ३२, बिलोली ३२, आदमपूर १६, लोहगाव ६०, सगरोळी १४, कुंडलवाडी ४७. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

RIMC Entrance Exam : राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमधील प्रवेशाची पात्रता परीक्षा आता ८ जूनला

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Latest Marathi News Live Update : अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर शुक्रवारी येणार आदेश

SCROLL FOR NEXT