file photo 
नांदेड

कोरोना ब्रेकिंग - उमरी तालुक्यात चार रुग्ण सापडले

अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोना पॉझिटिव्हचे रुग्ण नांदेड शहरात जास्त सापडले. त्यानंतर ग्रामिण भागात सुरुवात झाली. आता जिल्ह्याच्या एक एक तालुक्यात कोरोनाचा शिरकाव सुरु झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. मंगळवारी (ता. २६) आलेल्या अहवालात उमरी तालुक्यातील नवीन चार रुग्ण सापडले आहेत. दोन दिवसापूर्वी उमरी तालुक्यात दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली होती आता यातच चार रुग्ण सापडल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात पहिल्या टप्प्यात नांदेड जिल्हा निरंक होता पण दुसऱ्या टप्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरवात झाली. नांदेड शहरापुरता मर्यादित असलेला कोरोनाने आता ग्रामिण भागात हातपाय पसरायला सुरवात केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असल्यातरी कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढत चालल्यामुळे चिंता वाढली आहे. 

मंगळवारी अहवाल प्राप्त 
मंगळवारी (ता. २६) सायंकाळी पाच वाजता जिल्हा प्रशासनाच्या वतीने अहवाल देण्यात आला. त्यात १२२ अहवालापैकी १११ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर चार अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३७ झाली आहे. हे चारही रुग्ण उमरी भागातील आहेत. त्यामध्ये एक पुरुष (सात वर्षे), तीन महिला (नऊ, १४ आणि ४८ वर्षे) यांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

मुंबईहून आले असल्याची माहिती
उमरी शहरात हे चौघेजण मुंबईहून आले होते. त्यामुळे त्यांना घरी जाऊ दिले नाही. त्यांना सामाजिक न्याय भवन येथील कोविड सेंटरमध्ये दाखल केले होते व त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. आज त्या स्वॅबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर चव्हाण यांनी दिली. 

१६ रुग्णांना निगेटिव्ह आल्याने सुटी
दरम्यान, नांदेडमधील एनआरआय यात्री निवास कोवीड सेंटरमधील १६ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ते बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. उर्वरित ५१ रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यातील दोन महिला (वय ५२ आणि ५५) यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. सोमवारी (ता. २५) पाठविण्यात आलेल्या १७० स्वॅबचा तपासणी अहवाल मंगळवारी उशीरापर्यंत प्राप्त होईल तर मंगळवारी (ता. २६) ६३ संशयितांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असून त्यांचे अहवाल बुधवारी (ता. २७) संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील, अशी माहितीही त्यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT