Corona Update Akola Sakal
नांदेड

नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

सोमवारी १६४ अहवाल बाधीत; २९ रुग्ण उपचारातून झाले बरे

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरु झाला आहे. नांदेड जिल्हा देखील त्यात मागे नाही. दिवसेंदिवस जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी (ता.दहा) प्राप्त झालेल्या एक हजार ५१० अहवालापैकी १६४ जणांचे आहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. २९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९१ हजार १४५ इतकी झाली आहे. तर कोरोना आजारावर मात करुन ८७ हजार ९४७ रुग्ण घरी परतले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुण्णाच्या संख्येत वाढ होत असली तरी, उपचार सुरु असलेल्या गंभीर कोरोनाबाधित रुग्णांपैकी मागील अनेक दिवसांपासून जिल्हाभरात एकाचाही मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूची संख्या दोन हजार ६५५ इतक्यावर स्थिर आहे. सोमवारी आढळून आलेल्या बाधितांमध्ये नांदेड वाघाळा महापालीका हद्दीत १३८, नांदेड ग्रामीण तीन, धर्माबाद एक, माहूर एक, हदगाव एक, उमरी एक, भोकर दोन, कंधार एक, बिलोली एक, देगलूर एक, किनवट दोन, मुखेड दोन, परभणी पाच, हिंगोली दोन, वाशीम एक, यवतमाळ दोन असे १६४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील एक, नांदेड वाघाळा महापालिका गृह विलगीकरणातील २७ व तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणातील एक असे २९ रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात २३, जिल्हा कोविड सेंटर एक, नांदेड महापालिकेंतर्गत गृह विलगीकरणात ४२२, जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत ८८ व खासगी रुग्णालयात १० असे ५४४ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी चार बाधितांची प्रकृती गंभीर आहे.

नांदेड कोरोना मीटर

  1. एकूण बाधित- ९१ हजार १४५

  2. एकूण बरे - ८७ हजार ९४७

  3. एकूण मृत्यू - दोन हजार ६५५

  4. सोमवारी बाधित - १६४

  5. सोमवारी बरे - २९

  6. सोमवारी मृत्यू - शून्य

  7. उपचार सुरु - ५४४

  8. गंभीर रुग्ण - चार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT