file photo 
नांदेड

धोपटी आंंदोलकांवर गुन्हे दाखल...कुठे ते वाचा... ?

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या जिल्ह्यात लॉकडाउन सुरू आहे. यादरम्यान मोर्चा, आंदोलन किंवा धार्मीक कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्‍यक आहे. मात्र आपल्या न्याय व हक्कासाठी कायद्याची पायमल्ली करणाऱ्या नाभिक समाजाच्या पदाधिकारऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले. या आंदोलनकर्त्यांवर वजिराबाद पोलिस ठाण्यात विविध कलमावन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी (ता. नऊ) नाभिक समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी मोर्चा काढून आंदोलन केले होते. मात्र यासाठी त्यांनी प्रशासनाकडून कुठलीच परवानगी काढण्यात आली नव्हती. सध्या जिल्ह्यात लॉकडाउन सुरू असल्याने अशा आंदोलन व मोर्चा यासह आदी गर्दी होणाऱ्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किंवा पोलिसांची परवानगी आवश्‍यक असल्याच्या सुचना यापूर्वी जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या. 

व्यवसायास परवानगी द्या अन्यथा बेकारी भत्ता द्या

लॉकडाउन कालावधीत इतर व्यवसायास सवलत देण्यात आली. मात्र सलुन व्यवसायाला परवानगी दिली नाही. यामुळे अगोदरच गरीब असलेला समाज त्यांच्या हाताला काम नाही. हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मागणीला प्रशासनाने बगल दिली. त्यामुळे एक तर व्यवसायास परवानगी द्या अन्यथा बेकारी भत्ता द्या या मागणीसाठी शहरातील सलुन व्यावसायीकांनी धोपटी आंदोलन केले. 

विनापरवानगी धोपटी आंदोलन

मात्र नाभिक समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी परवानगी न काढता जिल्हाधिकारी कार्यालयावर धोपटी आंदोलन केले. ही बाब चुकीची असल्याने या प्रकरणात संबंधीतावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी पोलिसांना दिले. यावरून वजिराबाद पोलिस ठाण्याचे हवालदार प्रदीप राठोड यांनी तक्रार दिली. 

यांच्यावर झाले गुन्हे दाखल 

प्रदीप राठोड यांच्या तक्रारीवरुन अनिल अशोक संजीवनकर, चंद्रकांत लक्ष्मण श्रीमंगले, ज्ञानेश्‍वर दौलतराव बोकारे, बालाजी व्यंकटी चैनुरकर, जयराम सुधाकर शिंदे, बाळू सखाराम पवार, मदन कोंडिबा वाघमारे, संजय धोंडीबा गोगडपल्ले, दत्ता गोविंद चापलवार, प्रकाश विठ्ठलराव श्रीमंगले, बाळू उर्फ माधव गायकवाड यांच्यासह अन्य १५ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक श्री. राठोड करत आहेत.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT