सोयाबीन पाठोपाठ कपाशीचे नुकसान sakalNews
नांदेड

सोयाबीन पाठोपाठ कपाशीचे नुकसान

शेतकरी हतबल शासनाने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी

प्रकाश जैन

हिमायतनगर : तालुक्यात गेल्या पंधरवड्यापासून सातत्याने कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे नगदी पिक सोयाबीन हे हातातोंडाशी आलेले असताना होत असलेल्या विक्रमी पावसाने सोयाबीन हातचे गेले असून कपाशीवर शेतकऱ्यांची भिस्त होती. परंतू दुर्दैवाने या भागात कोसळणारा पाऊस थांबायचे नाव न घेता बरसत आहे. परिणामी सोयाबीन पाठोपाठ आता कपाशीचे पिक हे अतिवृष्टीत बाधीत झाल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट कोसळले आहे. शेतकरी आता हतबल झाला आहे. नैसर्गिक संकटाची मालिका शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

हिमायतनगर तालुका हा कोरडवाहू शेतीचा भाग असून एका खरिपाच्या हंगामावरच शेतकऱ्यांना वर्षभराच्या आर्थिक व्यवहाराची घडी बसवावी लागते. गेल्या वर्षी ही अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे नुकसान होवून हाती आलेल्या उत्पादनात विक्रमी घट झाली होती. अल्प प्रमाणात हाती आलेल्या उत्पादनावर शेतकऱ्यांना आपल्या मुलांबाळाचे शिक्षण, आरोग्य, सांभाळतांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले. हातात छदामही शिल्लक राहीला नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आपल्या उपवर मुलां मुलींचे लग्न पुढच्या वर्षावर ढकलावे लागले. परंतू याही वर्षी नैसर्गिक संकट पाठ सोडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. परतीचा पाऊस इतका क्रुर होवून विक्रमी पद्धतीने बरसेल याची पुसटसी कल्पना नसलेला बळीराजा आता उत्पादनांच्या प्रमुख स्त्रोतातील सोयाबीन व तसेच कपाशी ही वाया गेली असल्याने शेतकरी अर्थिकदृष्ट्या पुरता नागवा झाला आहे.

आणखीही या भागात सातत्याने पाऊस कोसळतच आहे. मानवनिर्मित संकट आणी नैसर्गिक संकट या दुहेरी संकटातून काटेरी वाटेने मार्ग क्रमण करीत असतांना शेतकरी आता हिंमत हारून बसून चिंतेच्या नजरेने बरसणाऱ्या पावसाकडे ओल्या डोळ्याने बघत असून नैसर्गिक संकटाने आता पुरता खचला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून सरसकट हेक्टरी प्रमाणात आर्थिक मदत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT