file photo 
नांदेड

अन्‍न योजनेतून मोफत तांदळाचे वितरण सुरु

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्‍यातील विशिष्‍ट आपत्‍कालीन परिस्थिती विचारात घेता, लक्ष्‍य निर्धारित सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतील लाभार्थ्‍यांना एप्रील, मे व जून या तीन महिन्यासाठी अन्‍नधान्‍याच्‍या दिलेल्‍या नियमित नियतनानुसार धान्य करण्यात येणार आहे.

अंत्‍योदयकार्ड धारकांना २३ किलो गहू व १२ किलो तांदुळ असे एकूण ३५ किलो धान्‍य, प्राधान्‍य कुटुंब योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना प्रति व्‍यक्‍ती तीन किलो गहू व दोन किलो तांदुळ आणि एपीएल शेतकरी यांना प्रति व्‍यक्‍ती गहू तीन किलो व तांदुळ दोन किलो (सर्व योजनांसाठी गहू दोन रुपये व तांदुळ तीन रुपये किलो) याप्रमाणे वाटप त्‍या-त्‍या महिन्‍यात करण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांना तांदूळ वाटप
एप्रील, मे व जून या तीन महिन्‍याचे वरीलप्रमाणे नियमित अन्‍नधान्‍याचे वाटप झाल्‍यानंतर त्‍या - त्‍या महिन्‍यात प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतील पात्र लाभार्थ्‍यांना ज्‍यामध्‍ये प्राधान्‍य कुटुंब योजनेतील लाभार्थ्‍यांना प्रति सदस्‍य प्रतिमाह पाच किलो तांदूळ (मोफत) त्‍याचबरोबर अंत्‍योदय योजनेतील लाभार्थ्‍यांना शिधापत्रिकेतील सदस्‍य संख्‍येनुसार प्रति सदस्‍य पाच किलोप्रमाणे प्रतिमाह तांदळाचे (मोफत) वाटप करण्‍यात येणार आहे.

वाटप पॉस मशीनमार्फत होणार
या दोन्‍ही प्रकारचे वाटप पॉस मशीनमार्फत होणार आहे. एप्रिलचे धान्‍य वाटप झाले असून मे महिन्याचे धान्‍य वाटप चालू आहे. तसेच ज्‍या लाभार्थ्‍यांकडे राशनकार्ड आहेत आणि त्‍यांचे उत्‍पन्न एक लाखापेक्षा कमी आहे परंतू त्‍यांची ऑनलाइन नोंदणी झालेली नाही, अशा कार्डधारकांसाठी आठ रुपये किलोप्रमाणे गहू व बारा रुपये किलोप्रमाणे तांदूळ रास्‍त भाव दुकानात उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेला आहे. या लाभार्थ्‍यांना प्रत्‍येकी तीन किलो गहू आठ रुपये दराने व दोन किलो तांदूळ बारा रुपये दराने मिळणार आहे. ऑनलाइन नसलेल्‍या या लाभार्थ्‍यांनी धान्‍य उचलल्‍यानंतर त्‍याची नोंद ई-झी फॉर्म अॅपमध्‍ये त्‍यांची नोंदणी होणार आहे.

साखर, तूर किंवा चनादाळ मिळणार
अंत्‍योदय योजनेचे लाभार्थी असलेल्‍या नागरीकांना प्रति कार्ड एक किलो साखर मिळणार आहे. तसेच अन्‍न नागरी पुरवठा व ग्रामीण विकास मंत्रालय यांचे नियतन आदेश पत्र ता. २८ एप्रिलनुसार राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा योजनेंतर्गत लक्ष निर्धारीत सार्वजनीक वितरण व्‍यवस्‍थेतील अंत्‍योदय अन्‍न योजना व प्राधान्‍य कुटूंब योजनेतील लाभार्थ्‍यांना प्रति शिधापत्रीका प्रतिमहा एक किलो डाळ या परीमानात (तुरदाळ व चनादाळ या दोन्‍हीपैकी एक दाळ एक किलो या कमाल मर्यादेत) मोफत वितरीत होणार आहे.

सोशल डिस्‍टन्‍ससिंगचे पालन करा
नांदेड तालुक्‍यात अंत्‍योदय योजनेत सात हजार ८३६ शिधात्रीका असून त्‍यावरील लोकसंख्‍या ३७ हजार १०२ इतकी आहे तर प्राधान्‍य कुटूंब योजनेत ६४ हजार १९५ शिधापत्रीका असून त्‍यावरील लोकसंख्‍या तीन लाख ११ हजार ७४० इतकी आहे. तसेच शेतकरी योजनेत पाच हजार १७४ शिधापत्रीका असुन त्‍यावरील लोकसंख्‍या २४ हजार ६५४ इतकी आहे. या सर्व शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानात गर्दी न करता सोशल डिस्‍टन्‍ससिंगचे पालन करुन धान्‍य प्राप्‍त करुन घ्‍यावे, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai: वसईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार! नायगाव खाडीवर दुमजली पूल; वर मेट्रो, तर खालून वाहने धावणार

Ind vs SA T20 World Cup : दोन देशच नाही, तर दोन भाऊ आमनेसामने, मैदानाबरोबरच डगआऊटमध्ये रंगणार सामना

सोलापूर-धुळे मार्गावर भीषण अपघातात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू, टाटा नेक्सॉनचा चुराडा

Latest Marathi News Live Update : विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार

Immunity Boosting Superfoods: वारंवार थकवा आणि सर्दीचा त्रास होतोय? इम्युनिटी बूस्टसाठी खा ‘हे’ एनर्जी देणारे सुपरफुड

SCROLL FOR NEXT