file Photo 
नांदेड

होम आयसोलेशनमुळे कोरोनाचा धोका वाढतोय? दोन हजार ३८० पैकी ६४५ पॉझिटिव्ह रुग्ण रूग्णालयामध्ये 

शिवचरण वावळे

नांदेड - नवीन वर्षापासून कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. मार्च महिण्यात शनिवारी ५९१, रविवारी ५६६ असे सलग दोनदिवस सर्वाधिक बाधित रुग्ण आढळे आहेत. सध्या दोन हजार ३८० कोरोना बाधितावर उपचार सुरु आहेत. त्यापैकी नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरणात एक हजार ३७४ व तालुक्यांतर्गत गृहविलगीकरणात ३६१ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढीस लागली नसेल ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

सुरुवातीच्या काळात कोरोनाची चाचणी झाल्या नंतर त्या व्यक्तीस अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत घरी न पाठवता यात्री निवासमध्ये व इतर ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत असे, अहवाल निगेटिव्ह आल्यास त्या व्यक्तीची प्रकृती बघुन शासकीय रुग्णालय किंवा पंजाब भवन येथे आयसोलेशन केले जात असे, त्यानंतर पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरच्यांची चाचणी, परिसर कंटेन्टमेंट झोन करुन सॅनिटायझ करणे अशी सर्व प्रक्रिया पूर्ण केली जात होती. त्यामुळे अगदी काही महिण्यात कोरोना आजार काही प्रमाणात का होईना आटोक्यात आला होता. 

स्वॅब अहवालास तीन दिवसापर्यंत विलंब

२६ जानेवारी नंतर लॉकडाउन मध्ये सुट दिल्याने नागरीक कुठलिही खबरदारी न घेता सैराभैरा फिरत होते. आरोग्य विभागाने देखील कोरोनावरील पकड सोडली नसली तरी, काही प्रमाणात ढिल दिली गेली. ते अनेकांना बरेही वाटले. परंतु स्वॅब देऊन घरी पाठविलेल्या व्यक्तीचा तीन दिवस उशिराने स्वॅब अहवाल प्राप्त होत असल्याने घरी सोडलेली व्यक्ती स्वॅब दिल्यानंतर घरी न थांबता हवे तिथे फिरुन येत असल्याने व त्यानंतर तो पॉझिटिव्ह आल्याचे कळाल्यानंतर त्याच्या संपर्कातील सर्वच व्यक्तींची कॉन्टॅक ट्रेसिंग होत नसल्याने देखील कोरोनाचे प्रमाण वाढीस लागले आहे. 

परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ नाही 
 
त्यामुळे आरोग्य विभागाने शासकीय रुग्णालयातील खाटा शिल्लक असेपर्यंत होम आयसोलेशन हा प्रकार काही दिवसाकरिता बंद करावा, स्वॅब घेतलेल्या व्यक्तींना घरी न सोडला त्यांना आरोग्य विभाग व सुरक्षा रक्षकांच्या निगराणीखाली पूर्वी प्रमाणेच आयसोलेट करावे अन्यथा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. अशी अनेक तज्ज्ञ व्यक्तींने ‘सकाळ’शी बोतलाना मत व्यक्त केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Bushra Bano IPS? : 'अस्सलाम-अलैकुम' म्हटल्यामुळे IPS अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली? बंगालमधील 'त्या' व्हिडिओवरून गदारोळ

Fact Check : विराट कोहली २०२७ चा वन डे वर्ल्ड कप इंग्लंडसाठी खेळणार? भारतीय क्रिकेटला हादरवून टाकणाऱ्या वृत्तामागचे सत्य

Tata News: चंद्रशेखरन यांचा U-Turn? पुन्हा Tata चेअरमनपदी निवड! निर्णय होताच शेअर्स 5% वाढले; नेमकं काय घडलं?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

UPI MDR 2026 : अमेरिकेच्या दबावामुळे युपीआय वर एमडीआर? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; जाणून घ्या नेमकं प्रकरण

SCROLL FOR NEXT