नांदेड : शहराच्या छत्रपती चौकात भरविण्यात येणाऱ्या दररोजच्या बाजारात शासनाने लॉकडाउनमध्ये घालून दिलेले नियम नागरिक व भाजीपाला विक्री करणारे दुकानदार पायदळी तुडवत आहेत. शारिरीक अंतराचा धज्जा उडवत या बाजारातून भाजीपाला खरेदी करणारे नागरिक गर्दी करत आहेत. शहरात सध्या कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने खबरदारी घ्यावी. बाजारातील भाजीपाल्यासोबत आपण आपल्या घरी कोरोनाचा विषाणू घेऊन जावु नका असे आवाहन शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संबंध जगभरात लॉकडाऊन सुरू आहे. भारतातही तिसऱ्या टप्यातील लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. प्रशासनाकडून लॉकडाउनचे नियम नागरिकांनी पाळून आपल्या घरातच थांबावे. शारिरीक अंतर ठेवून व्यवहार करावे. अत्यावश्यक काम असले तर घराबाहोर पडावे. अशा सक्त सुचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. मात्र नागरिक काही केल्या या सुचनांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे.
पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव
दररोजच्या बाजारात गर्दी होउ नये म्हणू शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी काही सुचना देउन पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव दिला. त्या प्रस्तावात नांदेडकरांच्या हिताच्या सुचना केल्या आहेत. त्यावर पोलिस अधीक्षक नक्कीच विचार करतील यात शंका नाही. शहरातील गर्दी टाळणे म्हणजेच कोरोनाचे युद्ध जिंकल्यासारखे आहे. नागरिक व व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रस्तावात काय आहेत सुचना
ँ बाजारात येणाऱ्या प्रत्येक विक्रेत्यास टोकन पद्धतीने सम व विषम तारखेस बसण्यास परवानगी द्यावी.
ँ दोन भाजीपाला विक्रेत्यामध्ये पुरेसे अंतर ठेवावे.
ँ ग्राहकांनीही शारिरीक अंतराचे भान ठेवून बाजार करावा.
ँ विक्रेता व ग्राहकांना बॉक्स तयार करुन द्यावे.
ँ भाजीपाला, फळ विक्रेत्यांशिवाय कोणालाही माल विक्रीस बसण्याची परवानगी देउ नये.
ँ बाजारातील प्रत्येकाच्या तोंडाला मास्कची सक्ती करावी.
ँ बाजाराच्या प्रवेशद्वारावर सॅनीटायझरची व्यवस्था करावी.
ँ विक्रेत्याने सायंकाळी जाताना आपल्या भाजीपाल्यातून निघालेला कचरा बाजूला न टाकता सोबत नेऊन त्याची विल्हेवाट लावा.
ँ लॉकडाउनचे नियम तोडणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सुचना द्याव्यात.
येथे क्लिक करा - सावधान : सायबर गुन्ह्यांबबत सतर्कता हाच पर्याय- सायबर तज्ज्ञ
गर्दी टाळा, सहकार्य करा
तरोडानाका परिसरातील छत्रपती चौकात दररोज भाजीपाला विक्री व खरेदी करण्याची परवानगी दिली.याचा अर्थ असा नाही की, त्या ठिकाणी लॉकडाउनचे नियम तुडवत गर्दी करायची. मात्र या ठिकाणी शारिरीक अंतराची पायमल्ली करत ग्राहक व विक्रेते तोंडाला मास्क न लावता भाजीपाला खरेदी विक्री करत आहेत. सध्या नांदेडमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येते. तरीही नागरिक घरातून बाहेर पडून भाजीपाला खरेदी करत असून प्रशासनाचे नियम मोडत आहेत. बाजारातून कोरोनासारखा विषाणू आपल्या घरी भाजीपाल्यामधून घेऊन जावू नका असे आवाहन करत सुरक्षीत अंतर ठेवून बाजार करा, प्रशासनाला मदत करुन महाराष्ट्र कोरोनामुक्त करा.
- चंद्रशेखर कदम (पोलिस निरीक्षक, शहर वाहतुक शाखा, नांदेड)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.